Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ

दीड हजार रुपयांची वाढ; सेवा समाप्तीनंतर मिळणार पेन्शन

मुंबई/प्रतिनिधी ः गेल्या अनेक दिवसांपासून अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध मागण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरु केले होते. अखेर मंगळवारी

एनटीपीसीच्या वीज निर्मितीत 11.6 टक्क्यांनी वाढ
विनयभंग करणार्‍या अधिकार्‍यांना येरेकरांचा आशीर्वाद ?
मराठमोळा अजित आगरकर बनला BCCI च्या निवड समितीचा अध्यक्ष

मुंबई/प्रतिनिधी ः गेल्या अनेक दिवसांपासून अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध मागण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरु केले होते. अखेर मंगळवारी राज्य सरकार आणि अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळामध्ये झालेल्या चर्चेनंतर अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या असून, त्यांच्या मानधनात दीड हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्याच्या आदेशाने तातडीची बैठक घेण्यात आली. सेविकांचे शिष्टमंडळ आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यात चर्चा सुरु झाली. या बैठकीत मंगळवारी तोडगा काढण्याबाबत प्रयत्न झालेत. त्यात यशही आले. सरकारने अंगणवाडी सेविकांसोबत झालेल्या बैठकीनंतर जाहीर केले की, राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दीड हजार रुपयांची वाढ करण्यात आली असून अंगणवाडी सेविकांसाठी सेवा समाप्तीनंतर पेन्शन योजनाही सुरु केली जाणार आहे. त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन दिले जाणार आहेत. राज्यातील अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले होते. अखेर या आंदोलनाची दखल राज्य सरकारने घेतली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांनी ठिय्या आंदोलन सुरु केले होते. तर काही अंगणवाडी सेविका थेट रायगड किल्ल्यावर पोहोचल्या होत्या. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीसमोर आंदोलन केले. मुंबईतील आझाद मैदावर आंदोलन करणार्‍या अंगणवाडी सेविकांनी आक्रमक पवित्रा घेत मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नसल्याचे सांगितले होते. या सेविकांच्या मानधनात राज्य सरकारने गेल्या साडे पाच वर्षात तर केंद्र सरकारने साडे चार वर्षापासून कोणतीही वाढ केली नव्हती. यामुळे अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या होत्या. हा प्रश्‍न विधानसभेतही चर्चेस आला होता.

COMMENTS