Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात भाजप, आघाडीच्या उमेदवारां विरोधात गुन्हे दाखल

पुणे/प्रतिनिधी ः पुण्यातील कसबा येथील निवडणूक भाजप आणि महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची केली असून, मतदानाच्या दिवशी आचार संहितेच्या भंग केल्या प्रकरण

मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊ नयेत
चक्क आई-वडिलांनीच केला दोन अल्पवयीन मुलींचा त्याग DAINIK LOKMNTHAN
प्रदूषण नियंत्रणासाठी साधनसामग्री वाढवा ः मुख्यमंत्री शिंदे

पुणे/प्रतिनिधी ः पुण्यातील कसबा येथील निवडणूक भाजप आणि महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची केली असून, मतदानाच्या दिवशी आचार संहितेच्या भंग केल्या प्रकरणी भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांतर आता काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा रुपाली ठोंबरे यांच्याविरुद्ध देखील आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी तक्रारी आल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत निवडणूक आयोगाने तक्रार दिली आहे.

पुण्यात मतदानावेळी गळ्यात कमळ चिन्हाचे उपरणे घालून मतदान केल्याबद्दल भाजपचे कसबा मतदार संघातील उमेदवार हेमंत रासने यांचावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाने विश्रामबागवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे यांनी निवडणूक निरीक्षकांकडे तक्रार केली होती. मतदान केंद्राच्या 100 मीटर आत कोणतेही पक्ष चिन्ह घेऊन त्यांचा मतदारांवर प्रभाव पडेल, अशी कृती करण्यास मज्जाव आहे. त्याचे उल्लंघन केल्याने हेमंत रासने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, निवडणूक प्रचार संपल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजप पैसे वाटप करीत असल्याचा आरोप करुन उपोषण केले होते. त्यातून आचारसंहिता भंग केल्याने त्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार रवींद्र धंगेकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS