मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणात ईडीने माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना मागच्या व
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणात ईडीने माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये अटक केली होती. त्यांच्या जामिन अर्जावर बुधवारी सुनावणी झाली असून त्यांच्या कोठढीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्याचा जेलमधील मुक्काम वाढला आहे.
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये अटक झाली होती. त्यांनतर आतापर्यंत त्यांनी अनेकदा जामिन मिळविण्यासाठी अर्ज दाखल केले. मात्र, त्यांना जामिन मंजूर करण्यात आला नाही. आजही कोर्टाने त्यांच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नोव्हेंबर 2021 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिकांवर गंभीर आरोप केले होते. फडणवीस म्हणाले होते की, मलिकांच्या कंपनीने अशा लोकांकडून जमीन खरेदी केली आहे, जे 1993 च्या मुंबई ब्लास्टमध्ये आरोपी आहेत. ही जमीन दाऊद इब्राहिमशी संबंधीत आहे. तसेच नवाब मलिकचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यानंतर ईडीने मनी लाँड्रींगप्रकरणीही नवाब मलिकांवर गुन्हे दाखल करत त्यांची कोट्यवधींची संपत्ती जप्त केली आहे.
COMMENTS