अकोले/प्रतिनिधी ः शिवजयंती ही नाचून साजरी करू यात पण वाचून देखील साजरी करू यात तसेच शिवाजी महाराजांचे विचार आपल्या आचरणात आणू या असे प्रतिपादन यु

अकोले/प्रतिनिधी ः शिवजयंती ही नाचून साजरी करू यात पण वाचून देखील साजरी करू यात तसेच शिवाजी महाराजांचे विचार आपल्या आचरणात आणू या असे प्रतिपादन युवा शिवव्याख्याते अक्षय वाकचौरे यांनी केले. अकोले महावितरण कार्यालयात शिवजयंतीनिमित्त परखतपुर येथील युवा शिवव्याख्याते कु. अक्षय वाकचौरे यांचे छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांवर अभ्यासपूर्ण व्याख्यान देत शाहिरी पोवाडाही सादर केला. याप्रसंगी उपकार्यकारी अभियंता ज्ञानेश बागुल, इंजि. मुळे, इंजि. जाधव, आत्माराम देशमुख, शिवदास देशमुख, नंदकुमार भांगरे, दिघे, विजू गोसावी, बुरुड, नाडेकर, सोनवणे, सुदाम गायकवाड, लोहकरे, सुभाष गायकवाड, अमोल गायकवाड, देवेंद्र, आदी कर्मचारी उपस्थित होते. कु.अक्षय वाकचौरे म्हणाले की- जेव्हा शिवा काशीद मारला गेला तेव्हा शिवाजी महाराज शिवा काशिद यांच्या घरी भेटायला गेले, तेव्हा शिवा काशिद ची पत्नी म्हणाली, माझे पती स्वराज्यासाठी कामास आले परंतु माझी विनंती आहे की मलाही सैनिक म्हणून स्वराज्यासाठी काम करण्याची संधी मिळावी, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे डोळे भरून आले व जगामध्ये पहिल्यांदा स्त्री सैनिक भरती झाली असेही कु.वाकचौरे यांनी सांगितले.
COMMENTS