Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सेवानिवृत्त मुख्याध्यापक लावरे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव तालुक्यातील उकडगाव येथील सुशीलामाई शंकराव काळे माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक तसेच शिवबालक व शिव अमृत

Ahmednagar : आमदार मोनिका राजळेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात | LOKNews24
संजय गांधी निराधार योजनेच्या 637 पात्र लाभार्थ्यांच्या अर्जांना मान्यता – आ.आशुतोष काळे
अण्णांनाही नकोत पारनेरला देवरे; लंके यांनी भेटून दिला सहा पानी अहवाल

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव तालुक्यातील उकडगाव येथील सुशीलामाई शंकराव काळे माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक तसेच शिवबालक व शिव अमृत कनिष्ठ महाविद्यालय उकडगावचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी आण्णासाहेब लावरे यांना नुकताच राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापन सेवा कार्य गौरव पुरस्कार श्रीरामपूर चे आमदार लहू कानडे यांच्या शुभहस्ते देण्यात आला.
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित ग्रामीण भागातील पाहिलत मराठी साहित्य संमेलन ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद सबनीस, स्वागत अध्यक्ष वंदना मुरकुटे तर आमदार लहू कानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होऊन यात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्‍यांना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात येत असते त्याच अनुषंगाने कोपरगाव तालुक्यातील उकडगाव येथील सौ सुशीलामाई शंकरराव काळे माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा शिव बालक व शिव अमृत कनिष्ठ महाविद्यालय उक्कडगावचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी लावरे यांना आपल्या सेवा कार्यात मराठी भाषेची निरंतर सेवा, प्रचार, प्रसार व संशोधन कार्य योगदानाबद्दल राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापन सेवा कार्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले या प्रसंगी आमदार लहू कानडे यांनी बोलतांना सांगितले की मुख्याध्यापक लावरे यांचे ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्रातील कार्य अतिशय उल्लेखनीय असून विशेष म्हणजे ते सेवानिवृत्त होऊन देखील शिक्षण क्षेत्रातील कार्य त्याच जोमाने करत असल्याने नक्कीच ही एक कौतुकास्पद बाब असल्याचे आमदार कानडे यांनी व्यक्त करत लावरे यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुन राऊत, उपाध्यक्ष संदीप पठारे, सचिव मिनीनाथ निपुंगे, प्रसिद्ध गीतकार बाबासाहेब सौदागर, ह.भ.प शिवाजी देशमुख, ह.भ.प दत्तात्रय बैराट, लेखक बाबुराव उपाध्य, यांच्यासह अर्जुन राऊत, हरिदास साखरे,प्राचार्य अनारसे, प्राचार्य शेळके, कवी आनंद कराड, शिरीष लांडगे, बाबासाहेब शेंडगे, लेखक व सामाजिक समीक्षक ऋषिकेश कांबळे, कवी विलास पडवळ यांच्यासह महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने पुरस्कारार्थी महिला व पुरुष तसेच साहित्यिक व कवी उपस्थित होते.

COMMENTS