Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चेंबूर फेस्टिवलच्या कार्यक्रमा दरम्यान  गायक सोनू निगम यांच्या वर करण्यात आला हल्ला

मुंबई प्रतिनिधी - उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर यांनी आयोजित केलेल्या चेंबूर फेस्टिवल चा शेवटच्या दिवशी परफॉर्मन्स सादर क

तीर्थक्षेत्र मोहनपुर येथे गुरुपोर्णिमा उत्सव
रेहेकुरी वनक्षेत्रात काळविटाच्या शिकारीचा प्रयत्न
किरकोळ महागाईत किंचित घट

मुंबई प्रतिनिधी – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर यांनी आयोजित केलेल्या चेंबूर फेस्टिवल चा शेवटच्या दिवशी परफॉर्मन्स सादर करण्यासाठी प्रसिद्ध गायक सोनू निगम चेंबूर फेस्टिवल ला आला होता. कार्यक्रम संपवून सोनू निगम स्टेजवरून खाली येत असताना पाठीमागून त्याला प्रकाश फातर्फेकर यांचा मुलगा स्वप्निल  फातर्फेकर याने पकडलं त्यावेळी सोनू निगम यांचे दोन साथीदार यांनी त्याला अडवले असता त्याने दोघांनाही पायऱ्यावरून खाली धक्काबुक्की करत ढकलून दिलं. यात सोनू निगम ही पायऱ्यांवर पडला. मात्र, यामध्ये सोनू निगमच्या एका साथीदाराला धक्काबुक्कीत डोक्याला मार लागला. यावेळी चेंबूर मधील झेन हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार घेतल्यानंतर सोनू निगम यांनी चेंबूर पोलीस ठाण्यात आमदार प्रकाश फातर्फेकर यांच्या मुलगा स्वप्नील फातर्फेकर विरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी यासंदर्भात आयपीसी कलम 341, 337  अन्वये गुन्हा नोंदवला असून पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत. यावेळी चेंबुर पोलीस स्थानकात आमदार प्रकाश फातर्फेकर आणि त्यांची मुलगी माजी नगरसेवक सुप्रदा फातर्फेकर आले असता त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

COMMENTS