Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 पंढरपुरात महाशिवरात्री निमित्त विठ्ठलाची भक्तीत भाविक गुंग 

पंढरपूर प्रतिनिधी - 'हरि-हरा नाही भेद' म्हणून पंढरपूरच्या सावळ्या विठ्ठलाकडे पाहिले जाते. विठ्ठलाच्या मस्तकावर साक्षात शिवलिंग आहे. म्हणूनच

अंबादास झावरे यांचे निधन
भाजपकडून सुडाचं राजकारण : मुख्यमंत्री ठाकरे | DAINIK LOKMNTHAN
स्मशानभूमीतील वाल्मीक तीर्थ ठरतंय आकर्षण

पंढरपूर प्रतिनिधी – ‘हरि-हरा नाही भेद’ म्हणून पंढरपूरच्या सावळ्या विठ्ठलाकडे पाहिले जाते. विठ्ठलाच्या मस्तकावर साक्षात शिवलिंग आहे. म्हणूनच बारा ज्योतिर्लिंगा नंतर पंढरपूरच्या विठ्ठलास देखील ज्योतिर्लिंग म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी विठ्ठलाची भक्ती केली. आणि यातूनच आज महाशिवरात्री दिवशी रात्री बारा वाजता होळकर संस्थान कडून विठ्ठलास जलाभिषेक केला जातो. या जलाभिषेकासाठी थेट गंगोत्री येथून गंगाजल पंढरपुरात आणण्यात आले आहे. ह्याच गंगाजलापासून रात्री बारा वाजता विठ्ठलास जलाभिषेक केला जाईल. यासाठी होळकर संस्थांनचे आदित्य फत्तेपुरकर यांच्याकडून गंगाजल श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीस हस्तांतरण होईल. आणि सुमारे 253 वर्षाची महाशिवरात्री दिवशी होळकर संस्थान कडून असणारी जलाभिषेकाची परंपरा कायम राखली जाईल.

COMMENTS