Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूरात मडकी खरेदीसाठी लोकांचा कल

कोल्हापूर प्रतिनिधी - गेल्या चार सहा दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात उंन्हाचा तडाखा वाढला असून ग्राहकांनी आपला कल मातीची मडकी खरेदीकडे वळवला आह

प्रत्येक भारतीयाने जवानांप्रती आदरभाव जोपासावा
मध्यप्रदेश, राजस्थानात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात
विकासाची नवी पहाट !

कोल्हापूर प्रतिनिधी – गेल्या चार सहा दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात उंन्हाचा तडाखा वाढला असून ग्राहकांनी आपला कल मातीची मडकी खरेदीकडे वळवला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या अनेक बाजारपेठात मडकी तयार करणाऱ्या कुंभार समाजाच्या व्यावसायिकांनी अधिकाअधिक मडकी तयार करण्यावर जोर दिला आहे. आरोग्याच्या दृष्टीने उन्हाळ्याच्या या दिवसात माठातील पाणी पिणे, माठातील ताक पिणे लोक पसंत करतात. या बद्दल अधिक माहिती सांगताना आकुर्डे ता भुदरगड येथील कुंभार व्यावसायिक संभाजी कुंभार म्हणाले की,” दरवर्षी आंम्ही उंन्हाळ्याच्या दिवसात अशी जास्त मकडी, माठ तयार करतो. आमचा हा व्यवसाय पिढीजात आहे. सध्या आमच्या घरी माझी पत्नी हे माठ तयार करतात. बहुतांश कामे त्याच करतात. दराचा विचार केला तर या दिवसात चांगला दर आम्हाला या विक्रीतून मिळतो. संसाराला चांगला हातभार लागतो.”

COMMENTS