Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 पीएम स्वनिधी योजनेबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली माहिती

औरंगाबाद प्रतिनिधी - छोट्या व्यवसायिकांसाठी प्रधानमंत्री स्वनिधी योजना मागील काही काळापासून सुरू करण्यात आली होती. त्या योजनेचा लाभ जालना जि

दहावी-बारावीचा निकाल वेळेत लागणार
रोजगार हमी योजनेतील कामांच्या लेबर बजेटची आखणी करा : नंदकुमार
खा. इम्तियाज जलील या शहराचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहे

औरंगाबाद प्रतिनिधी – छोट्या व्यवसायिकांसाठी प्रधानमंत्री स्वनिधी योजना मागील काही काळापासून सुरू करण्यात आली होती. त्या योजनेचा लाभ जालना जिल्ह्यातील छोट्या व्यवसायिकांना देण्यासाठी दिनांक 16 गुरुवार रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची विशेष उपस्थिती होती. सध्या दहा हजार रुपये प्रति व्यक्ती कर्ज वितरित करण्यात येणार असून हे कर्ज फेडल्यानंतर टप्प्याटप्प्याने 50 हजारा पर्यंत कर्ज देण्यात येणार असल्याची माहिती दानवे यांनी दिली.

 कोरोना महामारीच्या काळामध्ये हजारो लोकांना आपला व्यवसाय गमावण्याची वेळ आली होती. अशा छोट्या व्यावसायिकांना सरकारच्या वतीने हातभार लागावा म्हणून पीएम स्वनिधी योजना अंतर्गत विना गॅरंटीचे दहा हजार रुपये पर्यंतचे कर्ज दिले जात आहे. जालना जिल्ह्यातून 7000 जणांना प्रत्येकी दहा हजार रुपये या योजनेच्या लाभ मिळणार आहे. त्यापैकी 2000 जणांना आतापर्यंत कर्ज मंजूर झालेले असून उर्वरित लोकांचे आपलिकेशन विचाराधीन असून एक मार्च ला सर्वांना कर्जाचे वाटप करण्यात येईल अशी माहिती यावेळी बोलताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी दिली. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर आबा दानवे,  इत्यादींची उपस्थिती होती. 

COMMENTS