Homeताज्या बातम्यादेश

नागालँडच्या 6 जिल्ह्यांसाठी स्वतंत्र विकास मंडळांची घोषणा

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

कोहिमा/वृत्तसंस्था : नागालँड येथे 27 फेब्रुवारी रोजी होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. यात पूर्व नागालँडच्

प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा | LOKNews24
पी.एचडी फेलोशीप विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनावर येणार गदा
निवृत्तीवेतनधारकांची माहिती आता एकात्मिक पेन्शनर्स पोर्टलसोबत जोडणार ः श्रीनिवास

कोहिमा/वृत्तसंस्था : नागालँड येथे 27 फेब्रुवारी रोजी होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. यात पूर्व नागालँडच्या 6 जिल्ह्यांसाठी स्वतंत्र विकास मंडळ आणि विशेष पॅकेजचे आश्‍वासन देण्यात आले. पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
कोहिमा येथे आयोजित एका सभेत भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी एनडीपीपी-भाजपा आघाडीच्या संयुक्त अभियनाची सुरुवात केली. भाजपा नॅशलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव पार्टीशी (एनडीपीपी) आघाडी करून निवडणूक लढवत आहे. दोन्ही पक्ष एनडीपीपीच्या नेतृत्वाताली सत्तारुढ आघाडीचा भाग आहेत. एनडीपीपी 40 जागांवर आणि भाजपा 20 जागांवर निवडणूक लढवत आहे. यावेळी नड्डा म्हणाले की,  भाजप एकमेव असा पक्ष आहे जो राष्ट्रीय बांधिलकी आणि प्रादेशिक आकांक्षा समजतो. याचबोरबर नड्डा यांनी सांगितले की, पाच वर्षांपूर्वी उत्तर ईशान्य भागास नाकेबंदी, लक्षित हल्ले, दहशतवादास तोंड द्यावे लागत होते. मात्र आज नागालँड पुन्हा एकदा शांतात, समृद्धी आणि विकासाच्या मार्गावर आले आहे. जाहीरनामा सादर करताना नड्डा म्हणाले की, आम्ही प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्व नागालँड विकास मंडळाची स्थापना करू. आम्ही पूर्व नागालँडच्या विकासासाठी एक विशेष पॅकेज देऊ आणि लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसंकल्पात तरतूद करण्याच्या दिशेने काम करू अशी ग्वाही नड्डा यांनी दिली.

COMMENTS