Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्पर्धा परीक्षेत कणगरचे विद्यार्थी चमकले पाहिजे – सुनील गाढे

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी : विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतेनुसार अभ्यास करावा मला अधिकारी होण्यासाठी राहुरीचे तत्कालीन तहसीलदार राजेंद्र पाटील यांच्

डॉ. कुमार सप्तर्षी यांना मातुःश्री पद्मिनीबाई बन साधना पुरस्कार प्रदान
खेड महाविद्यालयात विदेशी पाहुण्यांनी घेतली धृपद कार्यशाळा
शिक्षकांनी सर्वोत्कृष्ट बनून विद्यार्थ्यांच्या मनात जिद्द निर्माण केली पाहिजे : डॉ.सर्जेराव निमसे

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी : विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतेनुसार अभ्यास करावा मला अधिकारी होण्यासाठी राहुरीचे तत्कालीन तहसीलदार राजेंद्र पाटील यांच्यामुळे ऊर्जा मिळाली. ग्रामीण भागातील मुलांना स्पर्धा परीक्षा म्हणजे काय हेच माहित नव्हते परंतू ग्रामीण भागातील विद्यार्थीच विद्यार्थीना मदत करु शकतो.त्यावेळी पाटील त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील मुलांनी स्पर्धा परीक्षा बद्दलचा न्यूनगंड बाजूला करुन प्रामाणिकपणे प्रयत्न करुन अभ्यास केल्यास जीवनात यशस्वी होता येते. माझ्या गावातील मुले स्पर्धा परीक्षेसाठी पुढे यावे यासाठीच ग्रामपंचायतने स्पर्धा परीक्षा पुस्तके उपलब्ध केली आहे. येणार्‍या परीक्षेतून कणगरचे विद्यार्थी चमकले पाहिजे असे सातारा जिल्ह्यातील पाटणचे उपविभागीय अधिकारी सुनिल गाढे यांनी सांगितले.
राहुरी तालुक्यातील कणगर येथे ग्रामपंचायत मार्फत स्पर्धा परीक्षा पुस्तके महाराष्ट्र सार्वजनिक वाचनालयकडे सुपुर्द करण्यात आले. कनगरचे सरपंच सर्जेराव घाडगे व कनगर चे भूमिपुत्र व  सातारा जिल्ह्यातील पाटण येथील प्रांतधिकारी सुनील गाढे साहेब यांचे संकल्पनेतून कनगर व पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना विवीध स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी 100 विविध प्रकारची पुस्तके खरेदी करण्यात आले. स्पर्धा परीक्षा पुस्तके खरेदीसाठी ग्रामपंचायत बरोबरच प्रांतधिकारी सुनील गाढे यांनीही मोलाचे सहकार्य केले. कणगर ग्रामपंचायतमध्ये छोटेखानी समारंभात हि सर्व पुस्तके विद्यार्थ्यांसाठी वाचनालयास प्रदान करताना प्रांतधिकारी गाढे बोलत होते.  यावेळी बोलताना सुनील गाढे म्हणाले की, आपल्या भागात पुस्तकें उपलब्ध नसल्याने अनेक इच्छुक विद्यार्थी परीक्षेत पासुन दुर राहतात.शहरातील मुले पुणे मुंबई येथे अभ्यासासाठी जातात. ग्रामीण भागातील मुले स्पर्धेच्या युगात कमी पडू नये म्हणून  स्पर्धा परीक्षेसाठी बसणारे विद्यार्थीनसाठी कणगर ग्रामपंचायतने पुस्तेके खरेदी केली आहेत.याचा विद्यार्थिनी लाभ घेतला पाहिजे कणगरचे अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत चमकले पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सरपंच सर्जेराव घाडगे यांनी उपक्रमाबाबत माहिती देऊन परिसरातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षामध्ये भाग घेऊन अधिकारी व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. स्पर्धा परीक्षे बाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रा. खाटेकर यांनीही आठवड्यातून दोन दिवस देण्याचे मान्य केले. यावेळी साठे मॅडम, भीमराज गाढे, उद्योजक रवी वरघुडे, गोविंदराव दिवे यांनीही मार्गदर्शन केले. सुधीर गाढे, श्याम गाग्रे जी.प सदस्य भास्कर गाढे, मच्छिंद्र वरघुडे, बाबासाहेब गाढे, भाऊ घाडगे, शिवाजी घाडगे, डॉ. रघुनाथ नालकर, राजू दिवे, प्रकाश नालकर, आण्णासाहेब शेटे सुभाष नालकर बाळासाहेब गाढे, भगवान घाडगे यांच्यासह ग्रामस्थ व स्पर्धा परीक्षेसाठी इच्छुक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य संदीप घाडगे यांनी केले.

COMMENTS