Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पत्रकार वारीशे यांच्या हत्येचा राहुरी पत्रकार परिषदेने केला निषेध

 देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या झालेल्या हत्येचा राहुरी तालुका मराठी पत्रकार परिषद व तालुक्यातील सर्व पत

नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेचे अध्यक्ष अग्रवालांचा तडकाफडकी राजीनामा
वाळूतस्करीचे शूटिंग करणार्‍यास मारहाण करून खुनाची धमकी
शासकीय कोरोना तपासणी केंद्रातील वेळेची मर्यादा हटवावी- सौ कोल्हे

 देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या झालेल्या हत्येचा राहुरी तालुका मराठी पत्रकार परिषद व तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपधीक्षक संदीप मिटके तहसीलदार फसीयोद्दीन शेख यांना लेखी निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.
प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांची नुकतीच हत्या करण्यात आली असून  याबाबत कुणाचा गुन्हा दाखल झालेला आहे. यातील आरोपींना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. तसेच गेल्या काही दिवसांमध्ये  पत्रकारांवर हल्ला होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. पत्रकार हा समाजासाठी लढणारा घटक असल्याने प्रशासनाने पत्रकारांना न्याय देण्याची गरज आहे असे म्हटले आहे. यावेळी राहुरी तालुका मराठी पत्रकार परिषदेचे मार्गदर्शक विलास कुलकर्णी, जिल्हा सल्लागार राजेंद्र उंडे, जिल्हा खजिनदार रियाज देशमुख, तालुका अध्यक्ष विनीत धसाळ, उपाध्यक्ष संतोष जाधव, श्रीकांत जाधव, राजेंद्र आढाव, मनोज साळवे, मीनाश पटेकर, आकाश येवले, ऋषिकेश राऊत, लक्ष्मण पटारे, सतीश फुलसौंदर आदी पत्रकार उपस्थित होते.

COMMENTS