Homeताज्या बातम्याविदेश

तुर्कीसह चार देशात भूकंपाचा हाहाकार  

तब्बल 1400 पेक्षाही अधिक जणांचा मृत्यू

अंकारा/वृत्तसंस्था : मध्यपूर्वेतील तुर्किये अर्थात तुर्की, सीरिया, लेबनॉन व इस्रायल हे 4 देश सोमवारी सकाळी भूकंपाने हादरले. भूकंपाचा केंद्रबिंदू

फॅमिली इमर्जन्सीमुळे विराट कोहली भारतात परतला
शेततळ्यात बुडून मायलेकांचा मृत्यू
पाणी 20 रुपये लिटर तर, दुधाला 26 रुपये का ? ः डॉ. अजित नवले

अंकारा/वृत्तसंस्था : मध्यपूर्वेतील तुर्किये अर्थात तुर्की, सीरिया, लेबनॉन व इस्रायल हे 4 देश सोमवारी सकाळी भूकंपाने हादरले. भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या तुर्किये व त्याच्या लगतच्या सीरियात या भूकंपामुळे सर्वाधिक विध्वंस झाला. तुर्कियेच्या ’अल सबाह’ या सर्वात मोठ्या न्यूज वेबसाइटच्या वृत्तानुसार, या भूकंपामुळे देशात 912 जणांचा बळी गेला आहे. तर 5385 जण जखमी झाले आहेत. सीरियात 560 जण ठार, तर 639 जण जखमी झालेत. दोन्ही देशांतील बळींचा आकडा 1400 वर पोहोचल्याचा दावा केला जात आहे. लेबनान व इस्त्रायलमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. पण सुदैवाने तिथे कोणतेही नुकसान झाले नाही. तुर्कीमध्ये दर 10 मिनिटाला 1 मृतदेह सापडत असल्यामुळे मृतांची संख्या वाढत चालली आहे.
या भूकंपाची तीव्रता 7.8 मॅग्निट्यूड होती. तसेच तुर्कीच्या गाझियान्टेप शहरानजीक या भूकंपाचे केंद्र होते. अमेरिकेच्या जियॉलॉजिकल सर्वेने दिलेल्या माहितीनुसार स्थानिक वेळेनुसार सोमवारी पहाटे 4.17 वाजता हा भूकंप जमिनीपासून 14.1 किमी खोलीवर झाला. याबाबत अमेरिकेच्या जियॉलॉजिकल सर्वेने सांगितले की, भूकंपाचे प्रमुख केंद्र हे गाझियान्टेप शहरापासून 33 किलोमीटर अंतरावर तर नूर्दगी शहरापासून 26 किमी अंतरावर होते. भूकंपाचे धक्के लेबनान आणि सीरियामध्ये देखील बसले आहेत. उत्तर सीरियातल्या अलेप्पो आणि हमा या शहरांमध्ये भूकंपामुळे अनेक इमारती कोसलळल्या आहेत.तुर्कस्तान आणि सीरियातील भूकंपामुळे आतापर्यंत सुमारे 912 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जातेय. तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. मृतांची संख्या अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तूर्कस्तानशिवाय सायप्रस, ग्रीस, जॉर्डन, लेबनान, सीरिया, इराक, जॉर्जिया आणि अर्मेनिया या देशांमध्ये देखील भूकंपाचे हादरे बसले आहेत. सोशल मीडियावर वेगवेगळ्या देशांमधील भूकंपाचे फोटो व्हायरल होत आहेत. तूर्कस्तानात मोठा विध्वंस झाला असल्याचं बोललं जात आहे. अनेक देशांमध्ये स्थानिक प्रशासनांनी भूकंपानंतर बचाव मोहिमा हाती घेतल्या आहेत. सीरियामध्ये देखील भूकंपामुळे मोठा विध्वंस झाला आहे. अलेप्पो आणि हमा शहरांमधल्या अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या टीम घटनास्थळी पोहोचल्या असून बचावकार्य सुरू आहे. लोक पहाटेच्या साखरझोपेत असताना हा भूकंप झाला. सीरियन सरकारने दिलेल्या माहितीनुसार देशात भूकंपामुळे आतापर्यंत 560 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींची संख्या 516 इतकी झाली आहे.

भारताकडून तुर्कीला मदतीचा हात- नैसर्गिक आपत्तीला तोंड देत असलेल्या तुर्कीसाठी भारताने मदतीचा हात पुढे केला आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत तुर्कीला मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एनडीआरएफ, मेडिकल टीम आणि श्‍वान पथक तुर्कीला पाठवण्याची भारताने तयारी सुरु केली आहे. प्रशिक्षित श्‍वानपथकांसह 100 कर्मचार्‍यांचा समावेश असलेल्या दोन एनडीआरएफची पथके आणि विशेष बचाव पथकातील आवश्यक उपकरणे भूकंपग्रस्त भागात जाण्यासाठी सज्ज झाली आहेत. तसेच प्रशिक्षित डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफसह आवश्यक औषधांसह तुर्कीला रवाना होतील.

COMMENTS