Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 पंढरपुरात अवैधरित्या  पिस्तुल घेऊन फिरणारा गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात 

पंढरपूर प्रतिनिधी - पंढरपूर शहरातील अंबाबाई पटांगण येथे रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्ती संशयतरित्या फिरत असल्याची खबर पंढरपूर पोलिसांना मिळली.

पालघरमध्ये लिव्ह-इन-पार्टनरची हत्या
सरकारला निर्णयाचे स्वातंत्र्य असावेच!
सत्ताधारी जातवर्ग आरोपांच्य छायेत !

पंढरपूर प्रतिनिधी – पंढरपूर शहरातील अंबाबाई पटांगण येथे रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्ती संशयतरित्या फिरत असल्याची खबर पंढरपूर पोलिसांना मिळली. तातडीने गुन्हे प्रगटीकरण शाखेचे चिमाजी केंद्रे, पोलीस कॉन्स्टेबल बिपिन ढेरे, शरद माने, मंडले, सुरज हेंबाडे आदींनी संशयितरित्या अंधारात उभ्या असलेल्या युवकाला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याच्याजवळ २ गावठी कट्टा अर्थात गावठी पिस्तूल आढळून आले. सदर व्यक्तीला पोलीस स्टेशनला आणून त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव धनाजी अटकळे (रा. शेगाव दुमाला) असे सांगितले. हे गावठी पिस्तूल त्याच्याकडे कुठून आले, तो रात्री कोणासाठी ती घेऊन बसला होता याची पोलीस चौकशी करत आहेत. पंढरपूर हे संतांचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी दिवसा पंढरपुरात तलवारी तळपलेल्या पंढरीच्या नागरिकांनी पाहिलेल्या आहेत. एवढी गुंडगिरी पंढरीत होती परंतु पोलीस प्रशासनाने ती गुंडगिरी संपुष्टात आणली. आता पुन्हा पंढरपूर शहर व ग्रामीण भागात अवैध धंदे, दारु, जुगार, मटका तसेच अंधाऱ्या रात्री लाखो रुपयाचा वाळूचा चोरटा धंदा सुरू झाला आहे. त्यातूनही पंढरीत अवैध वाळू उपसा करण्यांमध्ये चढा-ओढ लागली. त्यातूनही मोठे रणकंदन माजून काहींना आपला जीवही गमावावा लागला होता. 

आता पंढरपुरात गावठी पिस्तुल यापूर्वीही सापडले होते परंतु त्याच्या तळाशी जाऊन शोध घेण्यात पंढरपुरचे पोलीस प्रशासन अपयशी ठरले असे तर नाही ना? अशी चर्चा होताना दिसते. पुन्हा एकदा पंढरीत अवैधरित्या २ गावठी कट्टे (पिस्तुल) घेऊन फिरणारा व्यक्ती सापडल्याने पंढरपूर शहर आणि परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा तपास वरिष्ठ शहर पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांच्या मार्गदर्शनाखाली चिमाजी केंद्रे व त्यांचे सहकारी करत आहेत. पंढरपुरात गेल्या काही महिन्यांपासून चोरटी वाळू आणि गावठी कट्टे यांच्या गुन्ह्यांचे एक आव्हान पोलिसांसमोर उभा राहताना दिसते. याचा छडा पोलीस कशा पद्धतीने लावतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS