Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंढरपुरात 150 यात्रेकरूंना विषबाधा

भगर आमटी खाल्यानंतर प्रकृती बिघडली

सोलापूर/प्रतिनिधी : माघी वारी यात्रेसाठी पंढरपुरात जमलेल्या भाविकांपैकी सुमारे 150 जणांना अन्नातून विषबाधा झाली आहे. प्रकृती बिघडलेल्या सर्व भावि

पुण्याचे जिल्ह्याधिकारी सुहास दिवसे वादाच्या भोवर्‍यात
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत प्रवरा पब्लिक स्कूल राहाता तालुक्यात प्रथम
राज्यातील राजकीय नाट्य  

सोलापूर/प्रतिनिधी : माघी वारी यात्रेसाठी पंढरपुरात जमलेल्या भाविकांपैकी सुमारे 150 जणांना अन्नातून विषबाधा झाली आहे. प्रकृती बिघडलेल्या सर्व भाविकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर तातडीनं उपचार सुरू करण्यात आले असून सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते. आषाढी, कार्तिकी प्रमाणेच माघी यात्रेसाठी दरवर्षी हजारो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात.

 यंदाही लाखो भाविकांनी पंढरपुरात गर्दी केली आहे. मागील तीन दिवसांपासून इथे गर्दीचा ओघ वाढू लागला आहे. गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर मंदिर व्यवस्थापन आणि स्थानिक प्रशासन चोख व्यवस्था केली आहे. मात्र, कालच्या प्रकारामुळे काहीसे चिंतेचे वातावरण पसरले आहे. पंढरपूरातील संत निळोबा सेवा मंडळ या मठात बुधवारी रात्री भाविकांनी भगर आमटी खाल्ली. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास अनेकांना त्रास होऊ लागला. मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाला. याची माहिती मिळताच स्थानिक यंत्रणेनं तातडीनं हालचाल करून सर्वांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिथं त्यांच्यावर लगेचच उपचार सुरू करण्यात आले. उपचारानंतर सर्वांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

COMMENTS