Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिस अधिकार्‍याकडून पत्रकारास असभ्य भाषा

कर्जत तालुक्यातील पत्रकारांनी निवेदन देवून केला निषेध

कर्जत प्रतिनिधी ः सहाय्यक पोलीस निरीक्षकांकडून पत्रकारास असभ्य भाषा वापरल्याचा प्रकार कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे घडला आहे. नूतन विद्यालयाच्या

शेतकर्‍यांच्या मदतीसाठी पिक विम्याचे निकष बदला
माजी आमदार पिचड यांच्यामुळे धान खरेदी केंद्र सुरू
पञकार संघाच्या वतीने कोपरगाव येथे कोविड योध्दा रक्तदान शिबीर

कर्जत प्रतिनिधी ः सहाय्यक पोलीस निरीक्षकांकडून पत्रकारास असभ्य भाषा वापरल्याचा प्रकार कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे घडला आहे. नूतन विद्यालयाच्या आवारात एक दुचाकीस्वार गाडीचा मोठा आवाज करत असल्याची माहिती देण्यासाठी पत्रकार विनायक चव्हाण यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांना कॉल केला. त्यावेळी दिवटे यांचा चांगलाच पारा चढला. त्यांनी चव्हाण यांना असभ्य भाषा वापरली. त्याचा कर्जत तालुक्यातील पत्रकारांनी पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांना निवेदन देवून निषेध केला.

पत्रकार विनायक चव्हाण हे दिवटे यांना म्हणाले, नूतन विद्यालयाजवळ 40 ते 50 जणांचे टोळके असते. तेथून एक दुचाकी मोठ्याने आवाज करत फिरत आहे. याकडे तुमचे लक्ष नाही. येथे श्रीगोंद्यासारखा प्रकार घडू शकतो. त्यावर दिवटे हे चांगलेच भडकले. ते म्हणाले, तुम्ही काय म्हणता लक्ष नसतं. तुम्हाला माहितयं का 10 वेळा गाडी येते तिकडं. काहीही कसं मनाने म्हणता, गाडी येत नाही तिकडं. तुम्ही शाळेत जावून विचारा. तुम्ही मला नका शिकवत जावू असे म्हणत त्यांनी असभ्य भाषा वापरली. निवेदन दिल्यानंतर पत्रकारांशी चर्चा करताना डीवायएसपी अण्णासाहेब जाधव म्हणाले, पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी नागरिकांना योग्य भाषा वापरणे गरजेचे आहे. या निवेदनाच्या अनुषंगाने मिरजगाव पोलीस स्टेशनसह कार्यक्षेत्रातील इतर पोलीस स्टेशनला यासंबंधी लेखी सूचना देत आहे. यावेळी पत्रकारांनी फोन कॉलची ऑडिओ क्लिप डीवायएसपींना ऐकवली. ज्येष्ठ पत्रकार गणेश जेवरे, मोतीराम शिंदे, सोमनाथ गोडसे, महादेव सायकर, आशिष बोरा, मच्छिंद्र अनारसे, अफरोज पठाण, किरण जगताप, योगेश गांगर्डे, भाऊसाहेब तोरडमल, विनायक चव्हाण, किशोर कांबळे, किशोर आखाडे, आशिष निंबोरे, संतोष रणदिवे, अस्लम पठाण, महंमद पठाण, विनायक ढवळे यांनी हे पोलीस उपअधीक्षकांना निवेदन दिले. घटनेचा निषेध करून कारवाईची मागणी केली.

COMMENTS