राहुरी/प्रतिनिधी ः नुकतीच मराठा बहुउदेषीय संस्था संचालित शिवजयंती उत्सव समितीची नियोजन बैठक पांडुरंग मंगल कार्यालय या ठिकाणी संपन्न झाली. 19 फेब्
राहुरी/प्रतिनिधी ः नुकतीच मराठा बहुउदेषीय संस्था संचालित शिवजयंती उत्सव समितीची नियोजन बैठक पांडुरंग मंगल कार्यालय या ठिकाणी संपन्न झाली. 19 फेब्रुवारी रोजी साजरा होणार्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राहुरी शहरात भव्य कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येणार आहे.
या नियोजन बैठकीत सर्वानुमते शिवजयंती उत्सव समिती 2023 ची कार्यकारणी ठरविण्यात आली. शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी राजश्री घाडगे तर उपाध्यक्ष विद्या आरगडे यांची निवड करण्यात आली. तसेच सचिव अॅड. अनिता सरोदे (तोडमल), खजिनदार वैशाली शेळके सहखजिनदार जाणका लबडे, संघटक कल्याणी गुलदागड सहसंघटक वर्षा लांबे, कार्यध्यक्ष मंजिरी रिसबूड, सदस्य भारती तनपुरे, पूनम शेंडे,अपर्णा धमाळ, अश्विनी कल्हापुरे, पल्लवी वामन, अनिता शेंडे, शामल नवले आदींची निवड करण्यात आली.
तर राहुरी शहरात प्रथमच जिजाउंच्या लेकी या समूहातील महिलांनी एकत्रित येत ढोल पथक तयार केले आहे. या ढोल पथकाला प्रशिक्षण देण्यासाठी अक्षय दळवी, रुपेश कुर्हे, मंगेश ढूस हे परिश्रम घेत आहेत. तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन सागर पाटील पहात आहेत. ढोल पथकाचा वादनाचा कार्यक्रम राहुरी शहरात होणार आहे. या ढोल पथकाचा प्रमुख म्हणून सुरेखा माकोवने यांची निवड करण्यात आलेली आहे.19 फेब्रुवारी 23 रोजी दुपारी 3 वाजता राहुरी शहरातील आनंद ऋषीजी उद्यानामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेले आहे. संध्याकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंचधातूच्या मूर्तीचे विधिवत पूजन करून पालखी मिरवणुकीला सुरवात केली जाणार आहे.
मिरवणुकीमध्ये राहुरी शहरातील महिला, पुरुष, लहानमुल यांचा सहभाग मोठ्याप्रमांवर राहणार आहे. पालखी मिरवणुकीच्या प्रथम दर्शनी भागात पारंपारिक वाद्य तसेच महिलांचे ढोल पथक वादनाचा कार्यक्रम होणार आहे. मिरवणुकीच्या सांगते नंतर आनंद ऋषीजी उद्यान या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती मराठा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र लांबे यांनी दिली. कार्यक्रमात जास्तीत जास्त बांधवानी सहभागी होण्याचे अवाहन राजेंद्र लबडे, संदीप गाडे, कांता तनपुरे, सतीष घुले, अनिल घोरपडे, बलराज पाटील, धनंजय नरवडे, डॉ. भारत टेमक, गणेश वांढेकर, किरण डुकरे, मधुकर घाडगे, निखील कोहकडे, रावसाहेब पटारे, सागर थोरवे, बाबा भोगाडे, सुभाष पवार, योगेश कोहकडे, अविनाश क्षीरसागर आदींनी केले आहे.
COMMENTS