Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात मनसे जिल्हाध्यक्षावर गोळीबार

पुणे ः पुण्याचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. राजगुरुनगरच्या सातकरस्थळ येथील राहत्या घरासमोर हा प्रकार घडला. या

मुंबई पोलिसांना धमकीचा फोन
सरपंच पदाचे आरक्षण; 16 एप्रिला तहसिलनिहाय तर 25 एप्रिल रोजी महिला आरक्षण सोडत
संघर्षातून मिळालेला मताधिकार बजवा!

पुणे ः पुण्याचे मनसे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. राजगुरुनगरच्या सातकरस्थळ येथील राहत्या घरासमोर हा प्रकार घडला. या गोळीबारात सुदैवाने जीवितहानी झाली नाही आहे. मागील अनेक वर्षांपासून समीर थिगळे मनसेत कार्यरत आहेत. कुख्यात गुंडानी हा गोळीबार केला आहे. कुटुंबीयांसमोरच गोळीबार केल्याने परिसरात आणि कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

गुंडानी समीर यांना धमकी दिली. त्यासोबतच पैशाची मागणीदेखील केली. मी खेडचा भाई आहे. एकाला घालवलाय, तुलाही माज आलाय संपवतोच तुला, असं म्हणत पिस्तुल रोखून समीर थिगळे यांच्याकडे पैशाची मागणी केली होती. त्यानंतर या गुंडांनी गोळीबार केला. गोळीबारामुळे परिसरात खळबळ उडाली होती. समीर थिगळे यांच्याकडे पैशाची मागणी करणार्‍या आरोपीवर याआधीही खुनाचा गुन्हा दाखल असून तो सध्या जामीनावर बाहेर आहे.  कुख्यात गुंडाने समीर यांच्या दिशेने गोळी चालवण्याचा प्रयत्न केला, मात्र पिस्तुलातून गोळी सुटलीच नाही. यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र त्यानंतर दहशत निर्माण करण्यासाठी गुंडांनी हवेत गोळीबार केला. यावेळी समीर थिगळे यांचे कुटुंब घटनास्थळी हजर होते.

गुंडानी त्यांंच्यासमोरच समीर यांना धमकावण्याचा प्रयत्न केला आणि घटनास्थळावरुन पळ काढला. या सगळ्या घटनेत मात्र कोणालाही इजा झाली नाही. याप्रकरणी राजगुरुनगर पोलिसांत मिलिंद जगदाळे आणि मयूर जगदाळे यांच्या विरोधात प्राणघातक हल्ला करत शस्त्राचा वापर करून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून राजगुरूनगर पोलीस या गुंडांचा शोध घेत आहेत. हे गुंड मोक्कातील आरोपी असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.  मागील काही वर्षांपासून समीर हे मनसेत कार्यरत आहे. पक्षाच्या कामात ते चांगलेच सक्रिय आहेत. त्यांची पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षपदी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेरनिवड केली होती. राज ठाकरेंनी त्यांना नियुक्तीपत्र दिले होते. खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर, हवेली या तालुक्यांची त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. पुण्यात आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये देखील मनसे सक्रीय होत आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणीही करण्यात आली आहे. मात्र, समीर यांच्यावर झालेल्या गोळीबारामुळे खळबळ उडाली आहे.

COMMENTS