Homeताज्या बातम्यादेश

आयकर विभागालाच फसवले

नौदलाच्या 18 कर्मचार्‍यांसह 31 जणांवर गुन्हा सीबीआयने दाखल केला 31 जणांवर गुन्हा

तिरुवनंतपुरम : प्राप्तीकर विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी नौदलाच्या 18 अधिकार्‍यांसह 31 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या अधिकार्‍यांवर

आंतर महाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत छत्रपती शिवाजी कॉलेजला पाच पदके
केदारनाथ मंदिर भक्तांसाठी खुलं !
मंदीचे सावट गडद

तिरुवनंतपुरम : प्राप्तीकर विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी नौदलाच्या 18 अधिकार्‍यांसह 31 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या अधिकार्‍यांवर 44 लाख रुपयांचे खोटे रिफंड क्लेम करून इन्कम टॅक्स विभागाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी केरळचे मुख्य आयकर आयुक्त टी एम सुगंथामाला यांनी सीबीआयला दिलेल्या तक्रारीनुसार नौदलाच्या 18 कर्मचार्‍यांसह, पोलीस कर्मचारी आणि दोन खासगी कंपन्यांच्या अधिकार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कन्नूरमधील अनेक जण 2016-17 पासून बोगस रिफंड देत असल्याचा दावा करत होता. या साठी एक मध्यस्त हा या रक्कमे पैकी 10 टक्के पैसे घेत होता. ही रक्कम मिळवण्यासाठी फॉर्म 16 मध्ये समाविष्ट नसलेल्या विविध बाबी त्यात घालून खोट्या कागद पत्रांच्या साह्याने आयकर रिफंड साठी खोटे दावे केले जात होते. तब्बल 51 पगारदार लोकांनी एजंटांच्या माध्यमातून आयकर परताव्याचा खोटा दावा केला. तसेच 51 करनिर्धारकांपैकी, ज्यांना आयकर परतावा मिळाला होता अशा 20 जणांना नोटीस बजावल्यानंतर त्यांनी तब्बल 24 लाख लाख रुपये परत केले आहेत.  तर भारतीय नौदलाचे 18 कर्मचारी आणि केरळ पोलिसांच्या 2 कर्मचार्‍यांसह 31 कर्मचारी हे दोषी असून त्यांनी तब्बल 44 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे आढळून आलेय.

COMMENTS