Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई-गोवा मार्गावरील अपघातात 9 जणांचा मृत्यू

रायगड/प्रतिनिधी ः मुंबई -गोवा महामार्गावर रायगडजवळील रेपोली गावाजवळ गुरुवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल 9 जण झाले आह

बस दरीत कोसळून 6 जवान शहीद
ट्रकच्या धडकेत प्रेमी युगूलाचा जागीच मृत्यू
समृद्धीवरील अपघातात माजी रणजीपटूचा अपघात

रायगड/प्रतिनिधी ः मुंबई -गोवा महामार्गावर रायगडजवळील रेपोली गावाजवळ गुरुवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल 9 जण झाले आहेत. हा अपघात काल पहाटे 5 च्या सुमारास घडला. या आपघातामुळे मुंबई गोवा मार्गावरची वाहतूक ही ठप्प झाली आहे. ट्रकने समोरून येणार्‍या कारला जोरदार धडक दिली. त्यामुळे हा अपघात झाला. समोरासमोर टक्कर झाल्याने कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. मृतांमध्ये हेदवी, डावखोत, सावंतवाडी येथील लोकांचा समावेश आहे. त्यामुळे या गावांमध्ये शोककळा पसरली आहे. अमोल रामचंद्र जाधव (वय 40, रा. हेदवी), दिनेश रघुनाथ जाधव (वय 36, रा. हेदवी),  कांचन काशिनाथ शिर्के (वय 50 ), नंदिनी निलेश पंडित (वय 35, रा. डावखोत), निलेश पंडित (वय 42, डावखोत), अनिता संतोष सावंत (वय 55, रा. सावंतवाडी),  मुद्रा निलेश पंडित (वय 12, डावखोत), लाड मामा (वय 58, रा. डावखोत), निशांत शशिकांत जाधव (वय 23) अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. 

COMMENTS