Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डबल इंजिन सरकारमुळे विकासकामांना गती

पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन - मुंबई मनपा निवडणुकीचे फुंकले रणशिंग

मुंबई/प्रतिनिधी ः मध्यंतरीच्या काळात महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राचा विकास रखडला होता, मात्र डबल इंजिनच्या सरकारमुळे या विकासाला गती

“या” नगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजला
औरंगाबाद महानगर पालिकेतर्फे शहरी पंतप्रधान आवास योजनेचे अर्ज वाटप
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर अ‍ॅसिड हल्ला

मुंबई/प्रतिनिधी ः मध्यंतरीच्या काळात महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राचा विकास रखडला होता, मात्र डबल इंजिनच्या सरकारमुळे या विकासाला गती मिळाली असून, मुंबईसह महाराष्ट्राचा कायापालट होतांना दिसून येत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मुंंबईत केले. वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) मैदानात डिजिटल पध्दतीने भूमीपूजन आणि लोकार्पण करण्यात आल्यानंतर ते उपस्थितांना संबोधित करतांना बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी विविध घोषणा करून, एकप्रकारे मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याचे दिसून आले.

यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, राज्याच्या विकासकामांची गती रखडली होती. मात्र आमचे डबल इंजिन सरकार आल्यानंतर विकासकामांनी खर्‍या अर्थाने गती पकडली असून, महाराष्ट्राच्या आणि प्रामुख्याने मुंबईच्या विकासासाठी निधीची कमकरता पडू देणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. राजकीय स्वार्थासाठी अनेक पक्ष आणि सरकार विकासकामांना बे्रक लावतांना आम्ही पाहिले आहे, मात्र राजकीय स्वार्थासाठी भाजपा आणि एनडीएची सरकारे विकासाच्या कामांना ब्रेक लावत नाहीत. आधी मुंबईत असे होताना वारंवार पाहिले आहे. मुंबईच्या विकासासाठी बजेटची कोणतीही कमतरता नाहीय. परंतू तो पैसा योग्य ठिकाणी लागला पाहिजे. काही काळ विकासाचे काम स्लो झाले होते. परंतू शिंदे-फडणवीसांची जोडी येताच पुन्हा वेग पकडला असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी आवुर्जन सांगितले.दिल्ली ते महाराष्ट्र, महाराष्ट्र ते मुंबई एक सरकार हवेय. फेरीवाल्यांचा धंदा झाला नाही, उसने पैसे घेतलेले होते, ते व्याज देण्यातच जात होते. घरी मुले उपाशी असायची. आता तसे होणार नाही. मिळालेल्या स्वनिधीवर व्याज द्यावे लागणार नाही. तुम्ही एक पाऊल पुढे या मी 11 पावले येण्यास तयार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील धारावी विकास प्रकल्प, इंदू मिल, यासह अनेक प्रकल्पांनी वेग घेतल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुंबईत पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मुंबई महापालिकेच्या सात सांडपाणी प्रकल्पांचे, तीन रुग्णालयांचे, 400 किमी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांचे आणि रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाचे भूमीपूजन करण्यात आले आहे. तसेच मेट्रो 2 अ, मेट्रो 7 आणि 20 आपला दवाखान्यांचे लोकार्पण करण्यात आले आहे.

इतर देशांच्या अर्थव्यवस्था रसातळाला – जगातील अनेक प्रगत देशांची अर्थव्यवस्था रसातळाला जातांना दिसून येत आहे. तेथे जीवनावश्यक अन्न-धान्यांच्या किंमती भडकल्या असल्या तरी, आपण भारतात मोफत रेशन देऊन गरीबांच्या घरीतील चूल विझू देत नसल्याचे पंतप्रधान मोदी यांनी आवुर्जन सांगितले. आपण पायाभूत सुविधांवर पैसे खर्च करत आहोत. गरीबांसाठीचे पैसे भ्रष्टाचारात जात होते. करदात्यांचा पैसा असाच जात होता. याचे नुकसान करोडो भारतीयांना झाले आहे. आता यात बदल झाला असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.  

मुंबईचा तीन वर्षात कायापालट करणार ः मुख्यमंत्री शिंदे मुंबईचा विकास करायचा आहे. चेहरामोहरा बदलायच. गेले 20 वर्ष झाले नाही ते 6 महिन्यात घडतेय. लोकांना बदल दिसतोय. विकासासोबत पुनर्विकासाचे प्रकल्पही मार्गी लावतोय. मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुढील 3 वर्षात मुंबईचा संपूर्ण कायापालट करण्याचा निर्णय सरकारने केला असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. केंद्रात, राज्यात आपलं सरकार आहे. येणार्‍या काही दिवसांत महापालिका निवडणुका येतील. तेव्हा विकासाचे डबल इंजिन त्याचे ट्रिपल इंजिनात रुपांतर होईल. मुंबईच्या विकासाची गती वाढेल असा विश्‍वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

COMMENTS