नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्र काँगे्रसमधील बेबंदशाही पुन्हा एकदा उघड झाली आहे. नाशिक पदवीधर निवडणूक लढवण्यासाठी डॉ
नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्र काँगे्रसमधील बेबंदशाही पुन्हा एकदा उघड झाली आहे. नाशिक पदवीधर निवडणूक लढवण्यासाठी डॉ. सुधीर तांबेंना उमेदवारीदेण्यासाठी त्यांचा मुलगा उमेदवारी मागत होता. अशावेळी पक्षाने सत्यजीतला उमेदवारी देण्यास कोणतीही हरकत नव्हती. सुधीर तांबे यांनी आपल्या मुलासाठी उमेदवारी दाखल केली नाही, याचाच अर्थ त्यांचा देखील मुलाला उमेदवारी द्यावी, असाच सूर होता. मग सत्यजीतला उमेदवारी देण्यास काँगे्रसचे ज्येष्ठ नेते अणि सत्यजीत तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात यांनीच विरोध केला का असा देखील
एक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो आहे.
मात्र याउलट सत्यजीत जर विधानपरिषदेत गेला असता, तर थोरातांसाठी उलट चांगलेच होते. कारण विधानसभेसाठी त्यांना सत्यजीतचा अडथळा भविष्यात आला नसता. मग सत्यजीतला उमेदवारी मिळू नये, म्हणून काँगे्रसमधील कोणत्या नेत्याने आपली ताकद पणाला लावली, याचे उत्तर यथावकाश समोर येईलच. मात्र काँग्रेसच एकप्रकारे तांबे पिता-पुत्रांना भाजपमध्ये जाण्यास एकप्रकारे प्रवृत्त करू पाहत आहे. सत्यजीतने जरी अपक्ष फॉर्म भरला असला तरी, काँगे्रसने अधिकृत पाठिंबा जाहीर करत, तो आमचाच उमेदवार आहे, असा दावा केला असता, तर कदाचित सत्यजीतची काँगे्रसमधून बाहेर पडण्याची कोंडी झाली असती. मात्र डॉ. सुधीर तांबे यांची चौकशी होईपर्यंत पक्षातून निलंबित करण्यात आल्यामुळे काँग्रेसमधील नेतेच तांबे पिता-पुत्रांना भाजपमध्ये ढकलण्यास प्रवृत्त करतांना दिसून येत आहे.
याचबरोबर कालच काँगे्रसचे नेते आशिष तांबे यांनी काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विशेष म्हणजे, पटोले यांच्यावर काँगे्रसचे संघटन मजबूत करण्यावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी एक-एक कार्यकर्ता आणि नेता पक्षासोबत जोडावा लागतो, तरच पक्ष मोठा होतो. मात्र पक्षातून कुणी बंड करत असेल, तर त्या बंडाला शमविण्यासाठी राजकीय डावपेच टाकावे लागतात. मात्र याउलट काँगे्रस त्यांना पक्षातून बाहेर पडण्यासाठी सुपीक मैदान तयार करून, आपला पराभव स्वतःच तयार करतांना दिसून येत आहे.
काँगे्रसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आक्रमक आहेत. ते कुणाचीही भीड न बाळगता थेट अंगावर घेण्यास मागेपुढे पाहत नाही. त्यामुळे आक्रमक नेता म्हणून त्यांची ओळख आहे. शिवाय ओबीसी चेहरा म्हणून राज्यात ते बेरजेचे गणित करू शकतात. मात्र पटोले जितके आक्रमक आहेत, तितक्याच लिलयापणे त्यांना डोक शांत ठेऊन राजकारण करता येत नसल्याचे दिसून येत आहे. राजकारणात विरोधकांना टक्कर द्यावी लागते, मात करावी लागते, मात्र त्यासाठी प्रचंंड संयम असावा लागतो. मात्र जर संयम आणि शांतता नसेल, तर आपले पक्षातील स्थान आणि राजकीय कारकीर्द धोक्यात येते. याचा अनुभव राज्यातील अनेक फायरब्रिगेड नेत्यांनी घेतला आहे.
त्यामुळे देशमुख यांचे पटोले यांच्यावर आरोप जरी गांभीर्याने घेण्याजोगे नसले तरी, हा विरोध पटोले यांनी मोडीत काढला पाहिजे. शिवाय पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना सोबत घेऊन रणनीती आखण्याची गरज आहे. आगामी काही महिन्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे अशावेळी काँग्रेसमधील बेबंदशाही पक्षाला रसातळाला घेऊन जाऊ शकते. त्यामुळे पटोले यांनीच पुढे येऊन ही बेबंदशाही मोडीत काढण्याची गरज आहे. नाशिक पदवीधरची जागा काँगे्रसकडे आहे. अशावेळी महाविकास आघाडीने जर आपला पाठिंबा सत्यजीत तांबेंना दिला नाही, तर काँगे्रसची पदवीधरची एक जागा कमी होऊन भाजप सत्यजीतला पाठिंबा देऊन ही जागा निवडून आणू शकतो. त्यामुळे नुकसान काँगे्रसचेच होणार आहे. त्यामुळे काँगे्रसने बेबंदशाही थांबवत निर्णय घेण्याची गरज आहे.
COMMENTS