Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सरकारने आतातरी खाशाबा जाधवांचा उचित सन्मान करावा : छत्रपती संभाजीराजे

मुंबई : 1952 साली भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे पैलवान खाशाबा जाधव यांची आज जयंती. त्यांच्या जयंती निमित्त गुगलने खास डूडल तयार करून त

स्वामी लखनगिरी महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन
या कारणामुळे रोहित पवारांच्या वडिलांनी राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार घेण्यास दिला नकार
लसीचे दोन डोस घेणार्‍यांनाचा महाविद्यालयात प्रवेश : ना. उदय सामंत

मुंबई : 1952 साली भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे पैलवान खाशाबा जाधव यांची आज जयंती. त्यांच्या जयंती निमित्त गुगलने खास डूडल तयार करून त्यांना अभिवादन केले आहे. मात्र त्यांच्या कार्याला उचित सन्मान देऊन अभिवादन करण्यासाठी सरकार केव्हा जागे होणार, हाच प्रश्‍न आहे, असे म्हणत छत्रपती संभाजीराजे यांनी उद्विग्न भावनेतून फेसबुक पोस्ट केली आहे.

छत्रपती संभाजीराजे म्हणतात की, देशासाठी ऑलिम्पिक पदक मिळविणार्‍या खेळाडूस सरकारकडून पद्म पुरस्काराने सन्मानित केले जाते. ही निश्‍चितच अभिमानास्पद बाब आहे. मात्र ज्यांनी देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले ते पैलवान खाशाबा जाधव अजूनही पद्म पुरस्कारापासून वंचित आहेत. छत्रपती संभाजीराजे राज्यसभा खासदार असताना त्यांनी 2017 ते 2022 अशी सहा वर्षे सलग, खाशाबांना मरणोत्तर पद्मविभूषण मिळावा, यासाठी केंद्रात सर्व पातळीवर वारंवार पाठपुरावा केला होता मात्र शेवटी त्यांची उपेक्षाच झाली. ही भावनाही त्यांनी आपल्या पोस्ट मधून मांडली आहे. आता तरी सरकारने जागे व्हावे, असे म्हणत या महान मल्लावर ऑलिम्पिकच्या मैदानातही अन्याय झाला होता, तरीदेखील देशासाठी पहिले ऑलिम्पिक पदक जिद्दीने जिंकून आणणार्‍या खाशाबा जाधव यांना पद्म पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा उचित गौरव करणे, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

COMMENTS