पस्तीस लाख रुपये किंमतीचे मुद्देमालासह वेहिशोबी साठ किलो चांदी जप्त

Homeअहमदनगर

पस्तीस लाख रुपये किंमतीचे मुद्देमालासह वेहिशोबी साठ किलो चांदी जप्त

कोपरगाव शहर प्रतिनिधी- पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक दिपाली काळे , उपविभागिय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी वेळोवेळी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनानुसार जिल्हयातील मालमत्तेच्या गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी व त्यांना आळा

कर्जतमधील अंबालिका शुगरवर आयकर विभागाचा छापा
ढगाळ वातावरणामुळे गहु काढणीला वेग
मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचं निधन l LokNews24

कोपरगाव शहर प्रतिनिधी- पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक दिपाली काळे , उपविभागिय पोलीस अधिकारी संजय सातव  यांनी वेळोवेळी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनानुसार जिल्हयातील मालमत्तेच्या गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी व त्यांना आळा
घालण्यासाठी पोलीसांची धडक कारवाई सुरू आहे. त्याच अनुषंगाने  जिल्हाधीकारी सो अनगर यांचेकडील करोना प्रतीबंध आदेश क्र डी सी कार्या /९/२/१/ २१२ /२०२१ आदेश अ नगर दि १४/०४/२०२९ अन्वये यांची अंमलबजावणी करणेकरीता साई कॉर्नर येथे नाकाबंदी दरम्यान पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी साठ किलो बेहिशोबी चांदी जप्त करत मोठी कारवाई केली आहे.

दि १७ २०२१ रोजी ९  वा.चे सुमारास पोलिस निरीक्षक देसले  यांच्या सोबत पोका खारतोडे ,पोका नवाळी , होमगार्डअमोल थोरात होमगार्ड विशाल कोळपे व चालक सफी साठे असे जिल्हाधीकारी  अहमदनगर यांचेकडील करोना प्रतीबंधआदेशाची अंमलबजावणी करणे करीता साई कॉर्नर येथे नाकाबंदी करीत असताना इसम नामे सौरभ अनिल पाटील वय २६ वर्ष धंदा व्यापार रा राजगुरुनगर हुपरी जि कोल्हापुर हा त्याचे मालकीचे मारुती सियाज कार क्र एम एच १८ ऐजे ९०२० हि घेउन येवला- कोपरगाव मार्गे शिर्डी कडे जात असताना त्याने वाहनाची काच उघडी ठेउन तोंडास मास्कलावलेला नवता यामुळे त्याचेवर दंडात्मक कार्यवाही करणे करीता त्याची कार थांबवली असता त्याने सांगीतेल की मी हार्डवेअर विक्री करणारा व्यापारी असुन माझे गाडीत काहीही नाही असे सांगीतल्याने कोपरगाव शहर पोस्टेचे पोनी वासुदेव देसले यांना सदर इसमाचा संशय आला असता त्यांनी सदर इसमास त्याचे गाडीची झडती देण्याबाबतसांगीतले असता गाडीतील पाठीमागील सिट पाहता त्यास चैन बसवलेली होती व काही भाग फुगीर दिसत होता यामुळे सदरची चैन उघडुन पाहता त्यात चोर कप्पा बनवलेला होता व त्यात एक पांढरे रंगाची गोणी लपवलेली होती. ती बाहेर काढून पाहता त्यात पांढरे रंगाच्या चांदीसदृश्य धातुचे ठोकळे दिसुन आले, त्यास पोनी देसले सो यांनी सदरचांदीसदृश्य धातु बाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले व सदर चांदी बाबत काही एक समाधान कारक उत्तर दिले नाही, पोनी देसले  यांनी त्यास त्याचा ताब्यातील साठ किलो चांदीचे काही खरेदीविक्रीचे कागदपत्रे सादर करणेबाबत सांगीतले असता त्याने माझ्याकडे मिळालेल्या साठ किलो चांदी खरेदीचा माझाकडेकोणताही कागद अथवा बिल नाही यामुळे पोनी देसले  यांनी स.फौ पवार यांना दोन पंचासह घटनास्थळी बोलवले पंचासमक्ष सफी पवार यांनी वाहनाचा तसेच त्यातील चांदीचा पंचनामा केला असता त्या कारमध्ये एकुण साठकिलो चांदी मिळुन आली सदर घटनेची माहीती वरिष्टांना कळवुन त्यांचे मार्गदर्शनानुसार आरोपी नामे सौरभ अनिल पाटील वय २६ वर्ष धंदा व्यापार रा राजगुरुनगर हुपरी जि कोल्हापुर याचेवर कोपरगाव शहर पोस्टेस गुरन १२०/२०२१ महाराष्ट्र पोलिस कायदा १२४ सह भादवी १८८(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदरगुन्हयातील वापरलेली पाच लाख रुपये किंमतीची मारुती सियाज कार क्र एम एच १८ ए जे ९०२० व तीस लाख रुपये किंमतीची साठ किलो चांदी असा एकूण पस्तीस लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सफो संजय पवार हे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत .

COMMENTS