कर्जत/प्रतिनिधी ः हिंदी साहित्यामधून मानवतेची शिकवण दिली जाते. हिंदी भाषेच्या बळावर खूप मोठे व्यवसाय चालत आहेत. या भाषेमुळे चित्रपट क्षेत्रात मोठ
कर्जत/प्रतिनिधी ः हिंदी साहित्यामधून मानवतेची शिकवण दिली जाते. हिंदी भाषेच्या बळावर खूप मोठे व्यवसाय चालत आहेत. या भाषेमुळे चित्रपट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत आहेत. हिंदी भाषेत खूप मधुरता असल्याने तिचा विविध देशांमध्ये वापर केला जात आहे, असे प्रतिपादन महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचे डॉ. देवेंद्र बहिरम यांनी केले. कर्जत तालुक्यातील खेडच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय हिंदी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कर्जत तालुका प्रेस क्लबचे सचिव प्रा. किरण जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्राचार्य डॉ. धर्मेंद्र साळवे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. डॉ. साळवे यांनी अध्यक्षीय समारोप केला. सूत्रसंचालन प्रा. संदीप भिसे यांनी केले. प्रा. शाहुराव पवार यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. शिवगुरू व्हंडकर, प्रा. शाहुराव पवार, प्रा. आतिश नाईकवाडे, प्रा. नवनाथ धवडे, डॉ. अनिल गदादे, प्रा. महादेव भांडवककर, भगवान काळे, रमेश जंजिरे, शीतल भोसले, अमोल जावळे, अंकुश शेटे, विठ्ठल यादव, माऊली जंजिरे, आबा भिसे यांनी परिश्रम घेतले. राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय व डॉ. जी. डी. सप्तर्षी ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविकात महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख प्रा. संदीप काळे म्हणाले, हिंदी भाषेचे महत्व विद्यार्थ्यांना समजावे. हिंदी भाषेच्या माध्यमातून उपलब्ध होणार्या रोजगाराच्या संधीची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
COMMENTS