देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः तनपुरे साखर कारखान्यात मागील सहा वर्षात कोट्यावधींचा गैरव्यवहार झाला. त्याच्या चौकशीच्या मागणीसाठी राहुरी तहसिल कार्य

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः तनपुरे साखर कारखान्यात मागील सहा वर्षात कोट्यावधींचा गैरव्यवहार झाला. त्याच्या चौकशीच्या मागणीसाठी राहुरी तहसिल कार्यालया समोर कारखाना बचाव कृती समितीतर्फे चक्री उपोषण सुरू केले आहे. आमचा बोलविता धणी कोणीच नाही.तालुक्यातील सर्व शेतकरी व वंचित घटक हाच आमचा धणी आहे.सत्ताधारी संचालक मंडळाने काल तहसिलदारांना निवेदन देताना जे आरोप केले. ते म्हणजे ’चोराच्या उलट्या बोंबा’ असाच प्रकार आहे.आमची काय चौकशी करायची ती करा पण तुमच्या सहा वर्षाच्या कारभाराची प्रथम चौकशी झाली पाहिजे.आमच्या आंदोलनाचा धसका घेऊन, सत्ताधार्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे, आमच्या चौकशीच्या मागणीची नौटंकी सुरू आहे. असे कृती समितीचे संयोजक अमृत धुमाळ यांनी सांगितले.
पत्रकारांशी बोलतांना धुमाळ म्हणाले, मागील सहा वर्षे कारखान्यात भंगार विक्री, साखर विक्री, इथेनॉल विक्री, कारखाना मालकीची जमीन विक्री, कारखाना मालकीच्या जमिनीतील गौण खनिज उत्खनन व विक्री, कारखाना संलग्न संस्थेतील शिक्षक भरती, डोनेशन अशा विविध प्रकरणात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रता नसतांना, साखर आयुक्तांची मान्यता नसतांना प्रभारी कार्यकारी संचालकपदी बी. एन. सरोदे यांची नेमणूक करण्यात आली. खासदार डॉ. सुजय विखे यांच्या ताब्यात सहा वर्षे कारखान्याची सूत्रे होती. त्यावेळी आमच्या चौकशीसाठी त्यांचे सहा वर्षे कुणी हात धरले होते काय? त्यांच्या गैरव्यवहारांच्या चौकशीची आम्ही मागणी केल्यावर यांना कंठ कसे फुटले? ते सभासदांच्या लक्षात आले आहे. यंदाच्या वर्षी कारखाना बंद ठेवून सभासद, कामगारांना वार्यावर सोडण्याचे पाप सत्ताधार्यांनी केले. विरोधकांनी कारखाना चालू करावा. असा कांगावा करून, कारखाना बंद ठेवण्याचा स्वतःचा नाकर्तेपणा दुसर्याच्या माथी मारण्याचा प्रकार केल्याचा आरोप धुमाळ यांनी केला. तहसिल कार्यालया समोर सुरु असलेल्या उपोषणात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अरुण पा.कडू, पंढरीनाथ पवार राजुभाऊ शेटे, दिलीप इंगळे, संजय पोटे, रविंद्र मोरे, धनराज गाडे, सुरेश लांबे, विलासराव कोबरणे, कोंडीराम विटनोर, बाळासाहेब जठार दत्ताञय जाधव, नारायण टेकाळे, अँड भाऊसाहेब पवार आदी सहभागी झाले होते.
COMMENTS