Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आनंद मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांचे व्यवहारज्ञान वाढीस लागते – रमेशगिरी महाराज

कोपरगाव प्रतिनिधी ः संत जनार्दन स्वामी महाराज महर्षी स्कूलमध्ये रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त खास अशा 25  व्या आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे

जायकवाडीला पाणी सोडण्याचा घातक निर्णय शासनाने घेऊ नये ः शिंदे
‘अग्निवीर’ उमेदवारांसाठी आमदार तनपुरेंकडून मोफत जेवण्याची व्यवस्था
विखे-जगतापांना फाईट देणार आता लंके – काळे; एकमेकांना ताकद दिली जाणार, नगर दक्षिणेच्या राजकारणात येणार रंगत

कोपरगाव प्रतिनिधी ः संत जनार्दन स्वामी महाराज महर्षी स्कूलमध्ये रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त खास अशा 25  व्या आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याचा उद्देश असा की विदयार्थ्यांमध्ये व्यावहारीक ज्ञान वाढीस लागत असे प्रतिपादन जनार्दन स्वामी महाराज महर्जी स्कूलचे विश्‍वस्त मठाधीपती प.पु. रमेशगिरीजी महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात केले आहे.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय होळकर, उपाध्यक्ष विलास कोते, सचिव अंबादास अंत्रे, विश्‍वस्त रामकृष्ण कोकाटे, ऍड अनिल जाधव, बाळासाहेब चव्हाण, शिवनाथ शिंदे जनार्दन स्वामी ट्रस्टचे व्यवस्थापक विजय जाधव व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प. पु. रमेशगिरी महाराज पुढे बोलताना म्हणाले की, सन 1998 साली स्वर्गीय मोहनराव चव्हाण साहेबानी दोन खोल्यांमध्ये ही शाळा सुरू केली आज 24 वर्षे पूर्ण होऊन शाळेचे रौप्य महोत्सवी वर्षे सुरू झाले आहे. पालकांची शाळेशी असलेली बांधिलकी अशीच टिकुण रहावी, असे आवाहन पालकांना केले. संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय होळकर यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की पालकांनी आपल्या पाल्यासाठी वेळ दिला पाहिजे ,वेळोवेळी आपल्या पाल्याची शालेय प्रगती, विविध कार्यक्रमा बद्दल माहिती घेतली पाहिजे. आनंद मेळावा हा कमवा व शिका या योजनेचाच एक भाग असून त्यातून विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक शिस्त निर्माण होते असे ते म्हणाले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत प्राचार्य राजेंद्र पानसरे यांनी केले तर सूत्र संचालन समृद्धी कोहोकडे व श्रद्धा तिडके यांनी केले तर आभार स्नेहल खंडिझोड हिने मानले  या  25 व्या आनंद मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी जयप्रकाश पांडेय , अनिल भागवत , विनायक सांगळे , महेश शिंदे , इम्रान शेख , किशोर भोसले , सारिका पाटील , शादमीन सय्यद , वनिता औताडे , सुरज तुवर , कल्पेश येवला, अमोल देशमुख , माधवी शिंदे , ज्ञानेश्‍वर कडलग यांसह सर्व शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले.

COMMENTS