Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात जातीनिहाय जनगणना करा

मराठा आरक्षण गोलमेज परिषदेत मागणी

जालना/प्रतिनिधी ः मराठा समाज पुन्हा एकदा आरक्षणासाठी आक्रमक झला असून, जालना शहरामध्ये मराठा आरक्षण गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषद

“ठाकरे साहेब भाजपचा अजेंडा राबवतात”
दुधाला प्रतिलिटर 40 रूपये भाव द्या
Aurangabad :कोरोनामुळे मृत्यू झालेल्या वारसांना मदतनिधी देण्याचे काम युद्धपातळीवर | LOKNews24

जालना/प्रतिनिधी ः मराठा समाज पुन्हा एकदा आरक्षणासाठी आक्रमक झला असून, जालना शहरामध्ये मराठा आरक्षण गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत राज्यात जातीनिहाय जनगणना करण्यासह एकूण 15 ठराव मंजूर करण्यात आले असून, आरक्षणासाठी कृती कार्यक्रम यावेळी ठरवण्यात आला. या परिषदेला आरक्षण मिळण्यासाठी लढणार्‍या राज्यातील विविध संघटना, अभ्यासक व सामान्य कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे मराठवाड्यात होणारे प्रत्येक कार्यक्रम उधळून लावण्याच्या ठरावासहित एकूण 15 ठराव घेण्यात आले. यापुढे मराठवाडयात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा कुठेही कार्यक्रम होत असल्यास, त्याचा सदनशीर मार्गाने विरोध करून कार्यक्रम उधळून लावण्यात यावा.  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवावे.  सर्वोच्च न्यायालयासमोर मराठा आरक्षणासंबंधी पुनर्विचार याचिकेसाठी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्रुटी दूर करून आवश्यक पद्धतीने सरकार दरबारी प्रयत्न करून ही याचिका सकारात्मक पद्धतीने निकाली काढावी. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील,यांचा अपमान करणार्‍यावर कडक कारवाई करण्यात यावी.  भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची मराठा आरक्षण उपसमितीवरून हकालपट्टी करावी. त्यांनी मराठा समन्वयाकामध्ये वाद लावण्याचे काम केले असून, गेल्या 4  महिन्यात त्यांनी एकही बैठक घेतली नाही. राज्यात जात निहाय जनगणना करण्यात यावी. राज्यपाल जातील तिथे बंद पाळला जाईल, आदी ठराव मंजूर करण्यात आले.  जालना येथे झालेल्या गोलमेज परिषदेत राज्यपालांनी गेल्या काही दिवसांत केलेल्या वादग्रस्त विधानांच निषेध करण्यात आल्याची माहिती मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांनी दिली. सोबतच यापुढे मराठवाड्यात जिथे-जिथे राज्यपाल यांचा कार्यक्रम असेल तिथे त्यांचा कार्यक्रम लोकशाही पद्धतीने सदनशीर मार्गाने विरोध करून उधळण्यात येईल. तसेच ते ज्याठिकाणी जाणार असतील त्या ठिकाणी बंद पाळून त्यांचा निषेध करण्यात येणार असल्याचा ठराव घेण्यात आला असल्याची माहित देखील  मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांनी दिली आहे.

चंद्रकांत पाटलांची हकालपट्टी करा – मराठा आरक्षण गोलमेज परिषदेत राज्य सरकारने नेमलेल्या मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याविषयी रोष व्यक्त करण्यात आला. तसेच त्यांची या पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. चंद्रकांत पाटील यांनी आश्‍वासन देण्याशिवाय काहीच केले नाही. तसेच त्यांनी मराठा समन्वयाकामध्ये वाद लावण्याचे काम केले. आत्ता देखील ते मराठा आरक्षण उपसमितीचीचे अध्यक्ष आहेत, पण त्यांच्याकडून बैठका घेतल्या जात नाही. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची मराठा आरक्षण उपसमितीचीच्या अध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्याचा ठराव सर्वांच्यामते घेण्यात आला असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांनी दिली आहे.

COMMENTS