Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

९० किलो गांजा 17 लाखांच्या मुद्देमालासह ३ जणांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई

ठाणे प्रतिनिधी - ठाण्यातील अंबरनाथ परिसरात १७ लाखांचा ९० किलो गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या ३ इसमांना ठाण्याच्या  विरोधी पथक गुन्हे शाखेच्या पथ

चोपडा तालुक्यात गेल्या आठवड्यात  झालेल्या अवकाळी पाऊसामुळे कांद्यापिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
शिक्षण क्षेत्राला लागलेली कीड
राज ठाकरेंच्या भाषणाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल

ठाणे प्रतिनिधी – ठाण्यातील अंबरनाथ परिसरात १७ लाखांचा ९० किलो गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या ३ इसमांना ठाण्याच्या  विरोधी पथक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील कारवाई सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. ५ जानेवारी रोजी साडे ४ वाजण्याच्या सुमारास अंबरनाथ येथील भालपाडा गाव, धामटान बस स्टॉप जवळ  काही जण १०० ते १२० किलो वजनी गांजा या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची प्राथमिक माहिती ठाण्याच्या अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेच्या वरिष्ठांना प्राप्त झाली. या मिळालेल्या माहितीनुसार अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेच्या वतीने भालपाडा गाव येथील धामटान बस स्टॉप जवळ एक विशेष पथक तैनात करून सापळा रचला. यावेळी काही इसम गाडीमधून संशयास्पद आढळताना दिसून आले. यावेळी अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेच्या पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांनी गाडी अडवून झडती घेतली असता त्यांना या इसमांच्या गाडीत जवळपास ९० किलो वजनी गांजा मिळून आला. या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेकडून हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे. रवी मुन्नीलाल जैस्वाल (३५) हसून कय्युम खान (२५) आणि मोहम्मद शॅडं रियाझ (२७) असे अटक करण्यात आलेल्या तीन इसमाची नावे आहेत. या अटक केलेल्या आरोपींकडून अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांना गाडीच्या डिक्की, बॉनेट, दरवाजा आणि सीटच्या खाली लपवून ठेवलेला 9 लाख रुपये किमतीचा 90 किलो वजनी गांजा आढळून आला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेकडून या चारचाकी गाडीसह ९० किलो गांजा असा एकूण १७ लाख ३६ हजार ४५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील कारवाई सुरु करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला गांजा या आरोपींनी कुठून आणला? एवढ्या मोठ्या प्रमाणात आणलेला हा  गांजा ते कुठे विक्री करणार होते? या प्रकारणात आणखी कोणी साथीदार आहेत का? आरोपींचे आणखी कोणी साथीदार यात सहभागी आहेत का? या संपूर्ण प्रकरणाचा तपस अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेच्या वतीने सुरु असल्याचे अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी सांगितले.

COMMENTS