मुंबई/प्रतिनिधी ः गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेदच्या विरोधात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आक्रमक पवित्रा घेतला असतांनाच, शुक्रवारी या वादात
मुंबई/प्रतिनिधी ः गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेदच्या विरोधात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आक्रमक पवित्रा घेतला असतांनाच, शुक्रवारी या वादात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उडी घेतली असून, त्यांनी राजस्थानच्या अलवरमधील भाजपच्या जन आक्रोश सभेचा व्हिडीओ ट्विट केला आहे. या सभेत काही महिलांना नाचवण्यात आले होते. यावरुन अंजली दमानिया यांनी चित्रा वाघ यांना सवाल विचारत भाजपवर टीका केली आहे.
गेल्या काही दिवलात उर्फी जावेद प्रकरणावरुन चित्रा वाघ संतप्त झाल्या आहेत. उर्फी जावेदचा नंगानाच महाराष्ट्रात चालू देणार नाही म्हणत चित्रा वाघ यांनी तिच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. उर्फीनेही मी असाच पेहराव करेल म्हणत प्रत्युत्तर दिले आहे. या प्रकरणावरुन दोघींमध्ये वार-पलटवार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अंजली दमानिया यांनी राजस्थानच्या अलवरमधील भाजपच्या जन आक्रोश सभेचा व्हिडीओ ट्विट केला आहे. प्रिय चित्राताई वाघ, भाजपच्या रमेश बिधुरी यांची ही जन आक्रोश महासभा आहे. या बद्दल आपल्याला काय मत आहे? याला आपण कुठली संस्कृती म्हणाल? याला आपण सांस्कृतिक कार्यक्रम म्हणाल का?, असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे.
राजस्थानच्या अलवरमध्ये भाजपची जन आक्रोश महासभा पार पडली. या सभेत महिलांना नाचवण्यात आले होते. या कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता हाच व्हिडीओ रिट्विट करून अंजली दमानिया यांनी चित्रा वाघ यांना सवाल केला आहे. यात चित्रा वाघ यांनाही टॅग केले आहे. अंजली दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधताना चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे. त्या म्हणाल्या, चित्रा वाघ यांची पत्रकार परिषद घेतली. ती बघून दु:ख झाले. मला त्यांच्याबद्दल आदर होता. संजय राठोड यांच्याविरोधात त्या लढल्या. मात्र राजकारणात कमबॅक करण्याचा, स्व:तचे अस्तित्व निर्माण करण्याचा किंवा मंत्रीपद मिळवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न होता.
पुढे बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या, काल संध्याकाळी मी जन आक्रोश सभेचा व्हिडीओ पाहिला तेव्हा राहवले नाही. राजस्थानमध्ये जनआक्रोश महासभा घेण्यात आली. त्यात तरुणी नाचत होत्या. त्याबद्दल तुमचे मत काय आहे? सुषमा अंधारे म्हणाल्या त्याप्रमाणे केतकी, कंगना आणि अमृता फडणवीस यांच्या कपड्यांबद्दल तुम्ही काही बोलणार नाहीत. प्रत्येक वेळी छत्रपतींच्या महाराष्ट्रात असे होऊ देणार नाही असा डायलॉग तुम्ही परत परत मारत होतात, आता कोणता डायलॉग मारणार असा सवालही दमानिया यांनी उपस्थित केला. सार्वजनिक ठिकाणी तोकडे कपडे परिधान करून अंगप्रदर्शन करणारी मॉडेल उर्फी जावेद हिच्या वर्तनावर राज्य महिला आयोगाने स्वाधिकाराने (सुमोटो) दखल का घेतली नाही, असा सवाल भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी गुरुवारी (ता.5) केला. राज्य महिला आयोग दुटप्पी असून आयोगाने दखल घेतली नसली तरी भाजप उर्फीचा नंगानाच चालू देणार नाही, असा इशारा वाघ यांनी दिला.
COMMENTS