मुंबई/प्रतिनिधी ः शिवसेना नेते खासदार संजय राऊत सध्या जामीनावर बाहेर असले तरी, त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर टीका करत, जहरी बाण सोडले आहे. मात्र स
मुंबई/प्रतिनिधी ः शिवसेना नेते खासदार संजय राऊत सध्या जामीनावर बाहेर असले तरी, त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर टीका करत, जहरी बाण सोडले आहे. मात्र संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होतांना दिसून येत आहे. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने संजय राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठी कोर्टात धाव घेतली, तर दुसरीकडे शिवडी कोर्टाकडून राऊतांविराधोत अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.
शिवडी न्यायालयाने हे वॉरंट काढलं आहे. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यास संजय राऊत वारंवार गैरहजर राहिल्याने न्यायालयाने हे वॉरंट बजावले आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यासंदर्भात न्यायालयाने सुनावणी घेतली होती. आता 24 जानेवारी रोजी या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. शंभर कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याच्या आरोप राऊत यांनी सोमय्या यांच्यावर केला होता. त्यावरून राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा करण्यात आला होता. शिवडी महानगरदंडाधिकार्यांकडे मेधा यांनी दाखल केलेल्या तक्रारीत, राऊत यांनी केलेले आरोप निराधार आणि पूर्णपणे बदनामीकारक असल्याचे म्हटले होते. तसेच राऊत यांना नोटीस बजावून मानहानीच्या आरोपाखाली फौजदारी कारवाई सुरू करण्याची मागणी केली होती.
COMMENTS