Homeताज्या बातम्यादेश

एनटीपीसीच्या वीज निर्मितीत 11.6 टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी वीजनिर्मिती कंपनी असलेल्या एनटीपीसीने एप्रिल-डिसेंबर 2022 या कालावधीत 295.4 बिलियन युनिट्स चे उत्पादन करत मागी

नवीन शैक्षणिक धोरणातील बदल टप्प्याटप्प्याने होणार ः अरुण भांगरे
जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय कायम
संजीवनीच्या सहा अभियंत्यांची नोकरीसाठी निवड

नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी वीजनिर्मिती कंपनी असलेल्या एनटीपीसीने एप्रिल-डिसेंबर 2022 या कालावधीत 295.4 बिलियन युनिट्स चे उत्पादन करत मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 11.6 टक्के वाढ नोंदवली. एकेरी (स्टँड अलोन) आधारावर, एनटीपीसीने एप्रिल-डिसेंबर 2022 दरम्यान 254.6 बिलियन युनिट्स वीजनिर्मिती, करत मागील वर्षाच्या तुलनेत 16.1 टक्के वाढ नोंदवली आहे.
कोळसा प्रकल्पांनी आर्थिक वर्ष 23 मध्ये 9-महिन्याच्या कालावधीसाठी 73.7 टक्के पीएलएफ नोंदविला होता, जो आर्थिक वर्ष 22 मध्ये याच कालावधीत 68.5 टक्के होता. एनटीपीसीची उत्कृष्ट कामगिरी एनटीपीसीचे अभियंते, कार्यान्वयन आणि देखभाल पद्धती आणि एनटीपीसी प्रणाली यांच्या कौशल्याची साक्ष आहे.तसेच, एनटीपीसीने 14.6 एमएमटी उत्पादन साध्य करून कॅप्टिव्ह खाणीतून कोळसा उत्पादनात अभूतपूर्व वाढ दर्शविली आहे, जी मागील वर्षाच्या याच कालावधीच्या  तुलनेत 51टक्के आहे. एनटीपीसी समूहाची स्थापित क्षमता 70824 मेगावॅट आहे. अलीकडेच, कंपनीने नवीकरणीय क्षमतेचा 3 गिगावॉटचा टप्पा ओलांडला आहे.

COMMENTS