यवतमाळ प्रतिनिधी - खोदकामात मिळालेले सोने कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवून सराफा व्यावसायिकाकडून 20 लाखांची रोकड लुटणार्या टोळीला गजाआड करण्यात
यवतमाळ प्रतिनिधी – खोदकामात मिळालेले सोने कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवून सराफा व्यावसायिकाकडून 20 लाखांची रोकड लुटणार्या टोळीला गजाआड करण्यात आले. त्यांच्याकडून सहा लाख 20 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून, चार आरोपींना तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई महागाव पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.सुरेंद्र प्रकाशराव गावंडे (वय 38, रा. आर्णी), असे सराफा व्यावसायिकाचे नाव आहे. खोदकामात सोन्याची नाणी मिळाली आहे. पाहिजे असल्यास कमी किमतीत विक्रीचे आमिष दाखविले. विश्वास पटविण्यासाठी दोन खर्या सोन्याची नाणे दाखिले. दीड किलो सोने असून, वीस लाखांत सौदा ठरला. त्यानंतर सराफा व मित्र यांना रोख 20 लाख रुपये घेवून राष्ट्रीय महामार्गावरील नांदगव्हाण शिवारात बोलावले. मारहाण करून सराफाकडील 20 लाख रुपयांच्या रकमेवर दरोडा टाकून पळ काढला. या प्रकरणी महागाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. चार आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सहा लाख 20 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. पुन्हा इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.
COMMENTS