ठाणे प्रतिनिधी - विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक झाला असून आजही ठाण्यात अज

ठाणे प्रतिनिधी – विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक झाला असून आजही ठाण्यात अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात ठाणे शहर भाजप च्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाणीवपूर्वक समाजात तेढ निर्माण होईल या हेतूने जाणीवपूर्वक वाद उत्पन्न करण्यासाठी वक्तव्ये करण्यात येत असून त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच असल्याचे मत यावेळी बोलताना आमदार निरंजन डावखरे यांनी मांडले. तर जो पर्यंत दोन्हीही नेते माफी मागणार नाहीत तोपर्यंत भाजप चे हे निशेध आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आमदार संजय केळकर यांनी स्पष्ट केले.
COMMENTS