Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सर्वसामान्यांच्या मुळ प्रश्नांना बगल देण्यासाठी भाजप सरकार कुठलाही विषय पुढे करीत आहे – नाना पटोले

भंडारा प्रतिनिधी - छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे समाजाला योग्य दिशा देणारे आहे. भाजप सरकार सर्व सामान्य

पुणेवाडी येथे माजी विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न 
मुंबई महापालिकेची 3 हजार कोटी पाणीपट्टी थकली
आयपीएलवर सट्टा लावणार्या सट्टेबाजांवर सेलूत छापा; चार आरोपींविरुध्द गुन्हा दाखल

भंडारा प्रतिनिधी – छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे समाजाला योग्य दिशा देणारे आहे. भाजप सरकार सर्व सामान्यांच्या मूळ प्रश्नांना बगल देण्यासाठी कुठलाही विषय पुढे करीत आहे अशी टिका काँगेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दि.2 जा ने रोजी भंडारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.

शिंदे फडणविस सरकार हे फक्त  शब्दफेक व आकडेफेक करणारे हिवाळी अधिवेशनात सरकारकडून मोठ्या प्रमाणात घोषणा करण्यात आल्या. मात्र त्यात काही सत्य नाही. हे सरकार फक्त शब्दफेक व आकडे फेक करणारे सरकार आहे. सरकारने धानाला हेक्टरी 15 हजार रुपये बोनस जाहीर केला असला तरी शेतकरी नाराज आहे. आमच्या महविकास आघाडी सरकारने धानाला 700 रुपये एकरी बो नस दिला होता. आताच्या सरकारने फक्त 428 रुपये एकरी बोनस जाहिर केला. असेही पटोले म्हणाले.नियम मोडल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने सरकारने जिल्ह्यांतील 105 धान खरेदी केंद्र अचानक बंद केल्याने शेतकरी संकटात सापडला होता. अखेर न्यायालयाने सरकारचा निर्णय रद्द करत सदर धान खरेदी केंद्र सुरू करण्या चे आदेश दिले. मग भाजपच्या एका केंद्रावर मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचे सिद्ध होवूनही त्याला पुन्हा धान खरेदी केंद्र देण्यात आले. असा सवालही नाना पटोले यांनी यावेळी केला.

COMMENTS