मुंबई ः मुंबईत महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये सर्वाधिक 1036 अपहरणाचे, तर 885 अत्याचाराच्या गुन्ह्यांची न
मुंबई ः मुंबईत महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये सर्वाधिक 1036 अपहरणाचे, तर 885 अत्याचाराच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे 549 तर अपहरणाचे 1029 एफआयआर दाखल झाले आहेत. अल्पवयीन आणि वयस्कर मुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्ये सुमारे तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे.
जानेवारी ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत मुंबईत 18 महिलांच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व खुनाच्या गुन्ह्यांची उकल करण्यात मुंबई पोलिसांना यश आले. या वर्षी पोक्सो (लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण) कायद्यांतर्गत बलात्काराच्या एकूण 549 एफआयआर नोंदवण्यात आल्या आहेत. त्यापैकी 549 प्रकरणे (95 टक्के) पोलिसांनी सोडवली आहेत. 2021 मध्ये हे प्रमाण 98 टक्के होते. पोक्सो अंतर्गत 450 विनयभंगाच्या गुन्ह्यांपैकी 391 (87 टक्के) प्रकरणे पोलिसांनी नोव्हेंबर महिन्यापर्यंत सोडवली आहेत. 2021 मध्ये 91 टक्के प्रकरणे पोलिसांनी सोडवली होती. या वर्षी, मुंबई पोलिसांनी महिलांच्या अपमानाच्या केवळ 81 टक्के प्रकरणे सोडवली आहेत, तर 2021 मध्ये हे प्रमाण 84 टक्के होते. या वर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत आयपीसी कलम 509 म्हणजेच जाणूनबुजून महिलेचा अपमान केल्याचे एकूण 632 गुन्हे दाखल झाले आहेत. 2021 मध्ये या कलमांतर्गत 480 प्रकरणे नोंदवण्यात आली होती. जाणूनबुजून महिलांचा अपमान करण्याच्या घटनांमध्ये 32 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत मुंबई पोलिसांनी‘इव्ह टीझिंगचे’ 27 गुन्हे दाखल केले आहेत. यातील 18 गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी कारवाईही केली. 2021 मध्ये अशा 37 प्रकरणांची नोंद आणि 29 प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली होती. एखाद्या मुलीकडे किंवा महिलेकडे 14 सेकंदांपेक्षा जास्त काळ टक लावून पाहणे हा ’इव्ह टीझिंग’ अंतर्गत गुन्हा आहे. या कलमांतर्गत एफआयआर नोंदवल्यावर गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपीला तीन महिने कारावासाची तरतूद आहे. मुंबईत राहणार्या महिलांसाठी दिलासादायक बाब म्हणजे ’इव्ह टीझिंग’ च्या घटनांमध्ये जवळपास 27 टक्क्यांनी घट झाली आहे.
COMMENTS