Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कडकायच्या थंडीतही पोलिस भरती साठी उमेदवारांची गर्दी

धुळे प्रतिनिधी - आज धुळे जिल्ह्यात एकीकडे 7.8 इतकी तापमानाची नोंद झाली असून कडाक्याच्या थंडीत एकीकडे वाढ झालेली असताना दुसरीकडे, मात्र धुळे जिल्

आजचे राशीचक्र रविवार, २४ ऑक्टोबर २०२१ अवश्य पहा
कौटुंबिक वादातून पतीने पत्नी व दोन मुलींना जिवंत जाळले
प्रत्येक भारतीयाने जवानांप्रती आदरभाव जोपासावा

धुळे प्रतिनिधी – आज धुळे जिल्ह्यात एकीकडे 7.8 इतकी तापमानाची नोंद झाली असून कडाक्याच्या थंडीत एकीकडे वाढ झालेली असताना दुसरीकडे, मात्र धुळे जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची गर्दी पाहायला मिळत आहे. कडाक्याच्या थंडीतही पोलीस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस भरतीची पूर्णतः तयारी करण्यात आली असून पुढील पाच दिवस चालणाऱ्या या पोलीस भरती प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यात आली आहे.धुळे जिल्ह्यात तब्बल 42 जागांसाठी पोलीस भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर उमेदवारांची गर्दी झाली आहे. बाहेर गावाहून आलेल्या उमेदवारांची गैरसोय टाळावी यासाठी पोलीस मुख्यालयातच या उमेदवारांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक चाचणीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसविण्यात आले असून प्रत्येक चाचणी प्रक्रिया ही पारदर्शकपणे होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर नियुक्ती करण्यात आली आहे.धुळे जिल्ह्यात 42 जागांसाठी तब्बल 3800 हून अधिक अर्ज दाखल झाले असून एक तृतीयपंथी उमेदवाराचा देखील यात समावेश आहे. या एका तृतीय पंथाची निवड चाचणी ही शेवटच्या दिवशी म्हणजे पाच जानेवारी रोजी पार पडणार असल्याची माहिती धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी यावेळी दिली.

COMMENTS