Homeताज्या बातम्यादेश

सहा देशांतून येणार्‍यांना कोरोना चाचणी बंधनकारक

नव्या वर्षात होणार अंमलबजावणी केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली ः चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार सुरुच असून, रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्यामुळे भारतात केंद्र सरकारने गुरुवारी महत्वपूर्ण निर्णय घेतला

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्‍याने केली आत्महत्या
लसीकरणासाठी युनिसेफने राज्याला सहकार्य करावे ः राज्यपाल रमेश बैस
चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले स्कॉर्पियो थेट संरक्षक पट्टीला जाऊ धडकली.

नवी दिल्ली ः चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार सुरुच असून, रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्यामुळे भारतात केंद्र सरकारने गुरुवारी महत्वपूर्ण निर्णय घेतला. सहा देशातून येणार्‍या प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याची अंमलबजावणी नव्या वर्षापासून करण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट केले की,  1 जानेवारी 2023 पासून चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया,सिंगापूर आणि थायलंड येथून येणार्‍या प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. त्यांना प्रवासापूर्वी हवाई सुविधा पोर्टलवर त्यांचा अहवाल अपलोड करावा लागेल. याआधी अमेरिकेने बुधवारी चीनमधून येणार्‍या सर्व प्रवाशांसाठी कोविड-19 संबंधित तपासणी अनिवार्य करण्याची घोषणा केली होती. चीनमध्ये झपाट्याने वाढणार्‍या संसर्गाच्या घटना पाहता, देशात व्हायरसशी संबंधित कठोर निर्बंध पुन्हा लागू होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, अधिकृत सूत्रांनी इशारा दिला आहे की, की पुढील 40 दिवस निर्णायक असणार आहेत, कारण जानेवारीमध्ये भारतात कोविड प्रकरणांमध्ये तीव्र वाढ होऊ शकते. आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले की, कोविडची लाट आली तरी मृत्यू आणि संक्रमित लोकांच्या रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण खूपच कमी असेल. एका अधिकार्‍याने सांगितले, पूर्वी,पूर्व आशियाला कोविड-19 चा फटका बसल्यानंतर 30-35 दिवसांनी भारतात साथीच्या रोगाची एक नवीन लाट आल्याचे आढळून आले होते. हा एक ट्रेंड आहे. दरम्यान, एका तज्ज्ञाने सांगितले की भारतातील परिस्थिती चीनपेक्षा वेगळी आहे. कारण येथे मोठ्या संख्येने लोक विषाणूच्या संपर्कात आले आहेत आणि भारतात व्यापक लसीकरण केले गेले आहे.

परदेशातून येणारे 39 प्रवासी कोरोनाबाधित – चीनसह इतर दहा देशांत कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्यामुळे मूळ भारतीय निवासी आपल्या मायदेशात परततांना दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांत, भारतात आलेल्या 6 हजार आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कोविड-19 चाचणी करण्यात आली होती, त्यापैकी 39 ’पॉझिटिव्ह’आढळले आहेत. चीन आणि दक्षिण कोरियासह काही देशांमध्ये कोविड-19 प्रकरणांची संख्या वेगाने वाढत असल्याने सरकारने लोकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे आणि राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहण्यास सांगितले आहे. कोविडची प्रकरणे वाढत असताना, सरकारने शनिवारपासून प्रत्येक आंतरराष्ट्रीय फ्लाइटमध्ये येणार्‍या दोन टक्के प्रवाशांची रँडमली कोविड चाचणी अनिवार्य केली आहे.

COMMENTS