डॉ. शेळके आत्महत्याप्रकरणी दोषींवर कारवाई करा : टोपे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. शेळके आत्महत्याप्रकरणी दोषींवर कारवाई करा : टोपे

अहमदनगर/प्रतिनिधी- पाथर्डी तालुक्यातील करंजी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. गणेश शेळके यांनी आत्महत्या केल्याने या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचे

मोटार वाहन निरीक्षक आयेशा हुसैनवर अफरातफरीचा गुन्हा
छत्रपती शिवराय कल्याणकारी राजे होते – आ.आशुतोष काळे
प्रा. मधुकर राळेभात यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन

अहमदनगर/प्रतिनिधी- पाथर्डी तालुक्यातील करंजी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. गणेश शेळके यांनी आत्महत्या केल्याने या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचे आदेश राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे. मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी नुकतीच याबाबत मंत्री टोपे यांची मुंबईत भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. त्यावर टोपे यांनी कारवाईचे आदेश दिल्याचे दहातोंडे यांनी सांगितले.
पाथर्डी तालुक्यातील करंजी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. गणेश शेळके यांनी तालुका आरोग्य अधिकारी, तहसीलदार व कलेक्टर या वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. ती करण्यापूर्वी त्यांनी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये वरिष्ठ अधिकार्‍यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. या पार्श्‍वभूमीवर डॉ. शेळके यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटप्रमाणे तालुका आरोग्य अधिकार्‍यावर कारवाई करण्याचे आदेश आरोग्य मंत्री टोपे यांनी आरोग्य विभागाच्या आयुक्तांना दिले असल्याची माहिती दहातोंडे यांनी दिली. डॉ. शेळके यांच्या आत्महत्या प्रकरणाला आता दहा दिवस उलटून गेले असून त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटप्रमाणे कोणाही वरिष्ठ अधिकार्‍यावर अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे डॉ. शेळके यांच्या कुटुंबियासह त्यांच्या नातेवाईकांकडून देखील तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. डॉ. शेळके यांना न्याय मिळवून देण्यासाठी मराठा महासंघाचे राज्य प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी आरोग्य मंत्री टोपे व गृहमंत्री दिलीप वळसे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. तसेच, ज्या वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून डॉ. शेळके यांनी आत्महत्या केली आहे, त्या संबंधित सर्व अधिकार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच डॉक्टर शेळके यांच्या कुटुंबीयांना तात्काळ 50 लाखाची मदत करण्यात यावी व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला तात्काळ शासन सेवेत घेण्यात यावे, अशी मागणी दहातोंडे यांनी आरोग्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

COMMENTS