Homeताज्या बातम्यादेश

ज्येष्ठ कलाकारांना मिळणार आर्थिक पाठबळ

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाची योजना

नवी दिल्ली : केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयातर्फे ‘ज्येष्ठ कलाकारांसाठी आर्थिक पाठबळ’  योजना राबविण्यात येते. कलाकारांसाठीचे मासिक निवृत्तीवेतन य

Yeola : छगन भुजबळ यांनी केली येवला शहरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी (Video)
‘इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर’ची स्थापना
श्रीलंकेतील अराजकता

नवी दिल्ली : केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयातर्फे ‘ज्येष्ठ कलाकारांसाठी आर्थिक पाठबळ’  योजना राबविण्यात येते. कलाकारांसाठीचे मासिक निवृत्तीवेतन या स्वरुपात देशभरातील वय वर्षे 60 आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ कलाकारांना आर्थिक मदत पुरविणे हा या योजनेचा उद्देश आहे.

या योजनेतील लाभार्थी कलाकारांना विहित वेळी निवृत्तीवेतन वितरीत होईल याची सुनिश्‍चिती करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा सरकारचा प्रयत्न असतो. मात्र, शिफारसपात्र कलाकारांना आर्थिक मदत मिळणे हे या योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांनी डिजिटल स्वरूपातील हयातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला इत्यादी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यावर अवलंबून असते. एकदा या लाभार्थ्यांकडून सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली की त्यानंतर निवृत्तीवेतन वितरीत करण्यासाठीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतात. कलाकारांना निवृत्तीवेतन देणे ही सातत्याने सुरु राहणारी प्रक्रिया असल्यामुळे, लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रे जमा करण्यात आल्यानंतर त्यांची प्रलंबित देय रक्कम त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी सतत कार्यवाही सुरु असते. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने 2009 मध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळाशी केलेल्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून वर्ष 2017 पूर्वी निवडण्यात आलेल्या लाभार्थ्यांना मासिक कलाकार निवृत्तीवेतनाची रक्कम वितरीत करण्याची जबाबदारी महामंडळाकडे सोपविण्यात आली आहे.भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या कामगिरीचा वेळोवेळी आढावा घेण्यात येत असून, कलाकारांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आल्यानंतर त्यांना वेळेवर निवृत्तीवेतन वितरीत करण्याच्या दृष्टीने महामंडळाला अनेक सूचना देखील जारी करण्यात येतात तसेच यासंदर्भातील त्रैमासिक अहवाल देखील महामंडळाकडून मागविण्यात येतो. ज्येष्ठ कलाकारांना निवृत्तीवेतन वितरीत करण्यात होत असलेला विलंब टाळण्यासाठी वर्ष 2017-18 पासून लाभार्थी कलाकारांकडून आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आल्यानंतर योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना सांस्कृतिक मंत्रालय स्वतःच निवृत्तीवेतन वितरीत करते. केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री  किशन रेड्डी यांनी  लोकसभेत ही माहिती दिली.

COMMENTS