Homeताज्या बातम्याविदेश

चीनमध्ये कोरोनामुळे हाहाकार

बीजिंगमध्ये सुरु आहे 24 तास अंत्यसंस्कार

बीजिंग/वृत्तसंस्था ः जगभरातील विविध देशांमध्ये कोरोनाची लाट आटोक्यात आली आहे. कोरोना रुग्णांची संख्या नगण्य असतांना, चीनमध्ये मात्र कोरोनाचा उद्

राज्यात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता
अहमदनगर जिल्ह्यात सोमवारपासून सर्व व्यवहार सुरु ; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
कुर्ला परिसरातील १२ मजली इमारतीला भीषण आग

बीजिंग/वृत्तसंस्था ः जगभरातील विविध देशांमध्ये कोरोनाची लाट आटोक्यात आली आहे. कोरोना रुग्णांची संख्या नगण्य असतांना, चीनमध्ये मात्र कोरोनाचा उद्रेक दिसून येत आहे. चीनमध्ये नागरिक रस्त्यावर उतरल्यानंतर सरकारने कोरोना निर्बंध रद्द केले होते. त्यानंतर कोरोनाचे संक्रमण वेगाने वाढत असून, आगामी काही दिवसांत तब्बल 60 टक्के जनता कोरोना संक्रमित होण्याची भीती तज्ज्ञांद्वारे वर्तवण्यात येत आहे.  


झिरो-कोविड पॉलिसी रद्द केल्यानंतर कोरोनाच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, रुग्णालयातील सर्व खाटा तुडुंब भरल्या आहेत. औषधे नाहीत, जीथे आहेत तिथे लांबच लांब रांगा लावाव्या लागतात. बीजिंगमधील स्मशानभूमीत 24 तास अंत्यसंस्कार केले जात आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, त्यासाठीची प्रतीक्षा यादी 2000 वर पोहोचली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, चीनमध्ये कोरोनाची प्रकरणे दिवसात नव्हे तर तासांत दुप्पट होत आहेत.


अमेरिकन शास्त्रज्ञ आणि महामारी तज्ज्ञ एरिक फेगल-डिंग यांनी सोशल मीडियावर चीनचा धक्कादायक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये रुग्णालये, स्मशानभूमी आणि मेडिकल स्टोअर्सची चिंताजनक स्थिती दिसून येत आहे. त्यांनी कोरोनाबाबत मोठा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, 90 महिन्यांत चीनची 60 टक्के लोकसंख्या आणि जगातील 10 टक्के लोकांना कोरोनाची लागण होईल. जवळपास 10 लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. नुकताच अमेरिकेच्या इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन नेही असाच अंदाज वर्तवला होता. तज्ज्ञांच्या मते, संभाव्य तीन लहरींपैकी पहिली लहर सध्या चीनमध्ये सुरू आहे. त्यानंतर जानेवारीच्या मध्यात दुसरी लाट येईल. सध्या देशात आठवडाभर लूनर ईयर सेलिब्रेशन म्हणजेच चंद्र वर्षाचा उत्सव सुरू आहे, त्यामुळे लाखो लोक देशात येतात आणि जातात. अशा परिस्थितीत रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. तिसरी लाट फेब्रुवारी ते मार्चच्या अखेरीस येऊ शकते. यावेळी सर्व लोक सुट्ट्या लक्षात घेऊन परततात. अशा परिस्थितीत, अधिक लोक संसर्गाची तक्रार करू शकतात.


नुकताच चीनमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. आयएचएमआयने अंदाज व्यक्त केला आहे की 2023 पर्यंत चीनमध्ये कोरोनामुळे 10 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होईल. चीनमधील कोविड निर्बंध उठवल्यानंतरची परिस्थिती लक्षात घेऊन हे अंदाज लावण्यात आले आहेत. अहवालानुसार, एप्रिलच्या सुरुवातीला चीनमध्ये कोरोनाच्या प्रकरणांची संख्या कमाल पातळीवर असेल. तोपर्यंत मृतांचा आकडा 3 लाख 22 हजारांवर पोहोचण्याची शक्यता आहे. आयएचएमआयचे संचालक क्रिस्टोफर मर्रे यांच्या मते, एप्रिलपर्यंत चीनच्या लोकसंख्येपैकी एक तृतीयांश लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली असेल. चीनचा दावा आहे की, त्यांच्या लोकसंख्येपैकी 90 टक्के नागरिकांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे. म्हणजेच त्यांना लसीचे सर्व डोस मिळाले आहेत. परंतु 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या केवळ 50 टक्के लोकांना पूर्णपणे लसीकरण केले गेले आहे. त्यांना गंभीर संसर्ग होण्याची भीती असते. याचे मुख्य कारण म्हणजे लसीवर लोकांचा विश्‍वास नसणे. त्याचे दुष्परिणाम काहींमध्ये दिसून येतात, जे उर्वरित लोकांना डोस घेण्यास प्रवृत्त करतात. हे विशेषतः वृद्धांमध्ये होत आहे. अशा लोकांचे म्हणणे आहे की, लस घेण्याऐवजी ते व्हायरसचा सामना करणे पसंत करतील. याशिवाय सरकारनेही लसीकरण सक्तीचे केलेले नाही.

COMMENTS