Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ ; गुन्हा दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी ः माहेरून 30 ते 40 लाख रूपये आणण्यासाठी विवाहितेचा सासरी छळ करण्यात आला. याप्रकरणी नगर शहरात माहेरी राहत असलेल्या पीडित विवाहि

Ahnedmagar : नगरकरांनो कोरोनाची लस न घेणाऱ्यांना रेशनही मिळणार नाही | LokNews24
प्रवासादरम्यान सापडलेली पर्स केली परत
मढी येथील यात्रेसाठी सर्वांनी जबाबदारी उचलावी

अहमदनगर/प्रतिनिधी ः माहेरून 30 ते 40 लाख रूपये आणण्यासाठी विवाहितेचा सासरी छळ करण्यात आला. याप्रकरणी नगर शहरात माहेरी राहत असलेल्या पीडित विवाहितेने भरोसा सेलकडे तक्रार केली होती. तेथे समझोता न झाल्याने अखेर विवाहितेच्या फिर्यादीवरून पतीसह तिघांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती साहील भरत बोरा (वय 31), सासरे भरत पन्नालाल बोरा (वय 58) व सासु कल्पना भरत बोरा (वय 56, सर्व रा. कांढवा बु., जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी यांचा विवाह 30 मे, 2014 रोजी साहील बोरासोबत झाला आहे. लग्नानंतर त्यांना सासरच्यांनी दोन वर्ष चांगले नांदविले. यानंतर फिर्यादीला पती साहील हा नेहमी मारहाण करत असे, व माहेरून पैसे आणण्याची सातत्याने मागणी करत असे. यानंतर भरोसा सेलने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

COMMENTS