तोतया व्यक्ती उभी करून केले खरेदीखत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तोतया व्यक्ती उभी करून केले खरेदीखत

बनावट दस्तऐवज नोंदवून जमीन व प्लॉट विक्री करणारी टोळी पकडलीअहमदनगर/प्रतिनिधी : जमिनीच्या मूळ मालकाच्या जागी तोतया व्यक्ती उभी करून खरेदी खत व बनावट द

नगर शहरात ‘या’ ठिकाणी महाराजांचा १२ फुट पुतळा उभारणार | LOKNews24
राहुरी तालुक्यात दुसरा डोस घेणारांना प्राधान्य ; लसीकरण नव्या पॅटर्नमुळे गर्दीवर नियंत्रण
कोरोना दहनचा संकल्प करुन… सदभावनेची गुढी उभारुया- घोडके

बनावट दस्तऐवज नोंदवून जमीन व प्लॉट विक्री करणारी टोळी पकडली
अहमदनगर/प्रतिनिधी : जमिनीच्या मूळ मालकाच्या जागी तोतया व्यक्ती उभी करून खरेदी खत व बनावट दस्तऐवज करून जमिनीची परस्पर विक्री करून फसवणूक करणारी टोळी कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या चोवीस तासात जेरबंद केली. या गुन्ह्याची हकिकत अशी की, शशिकांत तबाजी आठरे (वय 23, रा. मदडगांव, ता.जि.अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भादवि कलम 419, 420, 465, 460, 400, 471,34 प्रमाणे कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी शिताफीने पकड़ले. याबाबतची अधिक माहिती अशी की, नगर तालुक्यातील मदडगांव येथील सर्वे 182 मधील 01 हेक्टर (100 आर) क्षेत्राचे मूळ मालक अमीर मोहम्मद गौस शेख यांच्याऐवजी नाजिम मुस्ताक कुरेशी (रा. सबजेल चौक) याने (दि. 14) रोजी तोतया शेख नासिर शब्बीर यास खरेदी लिहून घेणार म्हणून उभा करुन व खरेदी देणार म्हणून मूळ मालक मुलगा यांच्या जागी याच तोतया व्यक्तीला उभे करून खरेदीखत 3294/2018 नोंदवून जमिनीचे मूळ मालक अमीर मोहम्मद गौस शेख यांची फसवणूक केली होती. याबाबत पोलिस स्टेशन येथे त्याचवेळी अमीर शेख यांच्या तक्रारीवरून भादवि कलम 419,420, 465, 467, 470, 471.24 प्रमाणे गुन्हा दाखल असून हा गुन्हा न्यायप्रविष्ट असताना पुन्हा दि. 25 जून 2021 रोजी नाजिम कुरेशी याने यातील तोतया व्यक्ती शेख नासिर शब्बीर, (त्याचा बनावट पत्ता रा. खर्डा, गावठाण, ता. जामखेड, जि. अहमदनगर), सैफ सत्तार बागवान (रा.घर नं 1821, सुभेदार गल्ली, रामचंद्र खुंट, अहमदनगर), सिध्दार्थ धनेश्‍वर सोलंकी (रा. प्लॉट नं 30, वाघस्कर कॉलनी, वडारवाडी भिंगार, अहमदनगर), राजेश रामु कनोजिया (रा.ब्लॉक नं बी.ए. माधव बाग, भिंगार, अहमदनगर), रोहित सिसवाल (पूर्ण नाव नाही, रा. भिंगार, ता. जि. अ.नगर) यांच्याशी संगनमत करुन पुन्हा नमुद जमीन ही बनावट खरेदीखत दस्त क्र 3532/2021 अन्वये नोंदवून पुन्हा पूर्वीच्या गुन्हयातील तोतया व्यक्ती शेख नासिर शब्बीर यास उभे करुन त्याचे बनावट आधार कार्ड 814531403946 व पॅन कार्ड बीएक्सएलजीआर 2767डी याचा वापर करून ही जमीन शशिकांत आठारे यांना विक्री करुन 11 लाख 85 हजार रुपये रोख रकमेची व 5 लाख 15 हजार रुपये रक्कम चेकने अशी एकूण 17 लाख रुपये रकमेची फसवणूक केली. यावरून सहा जणाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हा दाखल होताच कोतवाली पोलिसांनी तत्काळ कारवाई करून आरोपींना चौकशी करता ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली. यावरून पोलिसांनी त्यांना गुन्हयात अटक केली असून पुढील तपास पोलिस उप निरीक्षक सतीश शिरसाठ करीत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, नगर श़हर विभागाचे उप विभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राकेश मानगांवकर व पोलिस उप निरीक्षक शिरसाठ, पोलिस कॉन्स्टेबल बापूसाहेब गोरे व योगेश कवाष्टे यांनी केली आहे. या प्रकरणातील नाजिम मुस्ताक कुरेशी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द कोतवाली पोलिस ठाण्यात सहा व धुळे पोलिस ठाण्यात एक अशा गंभीर गुन्हयाची नोंद आहे.

COMMENTS