Homeताज्या बातम्यादेश

आगामी आर्थिक वर्ष भारतासाठी खडतर

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांचे भाकीत

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः संपूर्ण जग आजमितीस जागतिक मंदीच्या दिशेने प्रवास करत असून, भारताची अर्थव्यवस्था अजूनही भक्कम अवस्थेत असतांनाच, रिझर्व्ह बँ

नितीशकुमारांची विश्‍वासार्हता धोक्यात
सलमान खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी
ते कुठे बेपत्ता होते याचे उत्तर द्यावे

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः संपूर्ण जग आजमितीस जागतिक मंदीच्या दिशेने प्रवास करत असून, भारताची अर्थव्यवस्था अजूनही भक्कम अवस्थेत असतांनाच, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारतीय अर्थव्यवस्थेविषयी काही अंदाज व्यक्त केले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आगामी आर्थिक वर्ष खडतर असून, या काळात आपण 5 टक्के विकास दर गाठला तरी, आपण स्वतःला भाग्यवान समजले पाहिजे, असे सुतोवाच राजन यांनी केले आहे.


राजन यांनी राजस्थानमध्ये भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत सहभाग घेतला. यावेळी ते राहुल गांधींसोबत चालताना दिसले. त्यानंतर त्यांनी थेट हायवेवर राजस्थानच्या रणथंभोरच्या जंगलाजवळ खुर्च्या टाकून अनौपचारिक गप्पा मारल्या. राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरही ही मुलाखत पोस्ट केली आहे. यात त्यांनी देशातील बेरोजगारी, लघु उद्योग, वस्त्रोद्योग, आर्थिक नियोजन, आर्थिक विषमता, महागाई आणि व्याजदर या विषयांवर चर्चा केली आहे. यावेळी बोलतांना राजन म्हणाले की, पुढील वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेसाठी तसेच उर्वरित जगातील अर्थव्यवस्थांसाठीही कठीण असेल. पुढील वर्षी 5 टक्के विकास दर गाठण्याचे भारतासमोर आव्हान असेल. कारण प्रमुख व्याजदर वाढले आहेत आणि निर्यात मंदावली आहे. भारतात वाढणारी महागाईची समस्याही विकासासाठी नकारात्मक ठरणार आहे. रघुराम राजन म्हणाले की, बेरोजगारी ही मोठी समस्या असून प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळू शकत नाही. म्हणून खासगी क्षेत्राला पुढे यावे लागेल. तांत्रिक हस्तक्षेप वाढल्यास कृषी क्षेत्रात नोकर्‍या निर्माण होऊ शकतात. विकास दर वाढीच्या पार्श्‍वभूमीवर सेवा क्षेत्राला अधिक प्रोत्साहन द्यावे लागणार असल्याचेही राजन यांनी स्पष्ट केले. वाढते व्याजदर आणि बेरोजगारीमळे कोरोना काळात मध्यमवर्ग भरडला गेला. त्यामुळे नवी ध्येय धोरणे आखताना निम्नमध्यम वर्गीय आणि मध्यम वर्गीय लोकांना मुख्य प्रवाहात घेणे गरजेचे आहे.


देशाला आर्थिक सुधारणांची गरज – विकास दराच्या आकडेवारीबद्दल ते म्हणाले की, तुम्ही नेमके काय मोजत आहात त्यावर बर्‍याच गोष्टी अवलंबून असतात. जर तुम्ही मागच्या तिमाही अडचणींची असेल, त्या आधारावर आताची आकडेवारी चांगलीच वाटेल. म्हणूनच, विकासदराच्या बाबतीत वास्तवात कोविडपूर्व परिस्थितीशी तुलना येथे करता येऊ शकते. आणि जर तुम्ही 2022 च्या तुलनेत 2019 मध्ये पाहिले, तर ते वर्षाला सुमारे 2 टक्के वाढ होताना दिसत आहे. आमच्यासाठी ती खूपच कमी असल्याचे राजन म्हणाले.


मक्तेदारी मोडता आली पाहिजे – देशात काही भांडवलदारांच्या हातात संपत्ती केंद्रीत झाली आहे. आम्ही भांडवलशाहीच्या विरोधात नाही, पण आम्हाला स्पर्धेसाठी लढावे लागते. आपण मक्तेदारीच्या विरोधात असले पाहिजे. देशातील छोटे उद्योग मोठे का होत नाहीत या प्रश्‍नाला उत्तर देताना राजन म्हणाले, की या छोट्या उद्योगांना छोटे राहण्याची सवय झाली आहे. त्यांना लहान राहण्याचे काही फायदे अंगवळणी पडले आहेत. आपण ते फायदे काढून घेतो. त्याऐवजी तुम्ही असे का म्हणत नाही की, आपण मोठे झालो. कारण त्यानंतर हे फायदे पुढील पाच वर्षे मिळतील.वास्तविक देशातील छोट्या उद्योगांना पोषक वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी सरकारची असल्याचे त्यांनी यातून स्पष्ट केले.

COMMENTS