Homeताज्या बातम्यादेश

सोशल मीडियामुळे देशाच्या अखंडतेला धोका

केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली : सोशल मीडियाच्या माध्यमातून परदेशात बसून भारतात दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन दिले जाते. यात कट्टरता दिसून येत असून भारताच्या एकता अ

Madha : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन (Video)
पंतप्रधान मोदींना फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान
लासलगांव विंचूर सह 16 गाव पाणी पुरवठा प्रश्न गंभीर पाणी प्रश्न त्वरित मार्गी लावा अन्यथा   

नवी दिल्ली : सोशल मीडियाच्या माध्यमातून परदेशात बसून भारतात दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन दिले जाते. यात कट्टरता दिसून येत असून भारताच्या एकता अखंडतेला धोका असल्याची माहिती केंद्र सरकारने लोकसभेत दिली. यासंदर्भातील एका प्रश्‍नाला उत्तर देताना गृहमंत्रालयाने ही माहिती दिली. सोशल मिडीयावरील दहशतवादाबाबत केंद्र सरकारचे विधान अशावेळी आले आहे, जेव्हा एक दिवस आधी सोमवारी सरकारने पाकिस्तानस्थित ओटीटी प्लॅटफॉर्मची वेबसाइट, 2 मोबाइल अ‍ॅप्स, 4 सोशल मीडिया खाती आणि स्मार्ट टीव्ही अ‍ॅपवर बंदी घालण्याच्या सूचना जारी केल्या होत्या.
 या प्लॅटफॉर्मद्वारे दाखवल्या जाणार्या वेब सीरिजमुळे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि अखंडतेला हानी पोहोचू शकते, असे सरकारने म्हटले आहे. विडली टीव्हीने 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर ’सेवक: द कन्फेशन्स’ नावाची वेब सिरीज प्रसिद्ध केली होती, जी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा, सार्वभौमत्व आणि अखंडतेला हानिकारक असल्याचे आढळून आल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सांगितले. तसेच, या वेब सिरीजचे आतापर्यंत 3 भाग रिलीज करण्यात आले आहेत, असेही मंत्रालयाने सांगितले. दरम्यान, मंत्रालयातील वरिष्ठ सल्लागार कांचन गुप्ता यांनी ट्विट केले की, पूर्णपणे बनावट वेब सिरीज ’सेवक’चे मूल्यांकन केल्यानंतर पाकिस्तानस्थित विडली टीव्हीवर कारवाई करण्यात आली. वेब सिरीजमध्ये ऑपरेशन ब्लू स्टार आणि त्यानंतरची घटना, अयोध्येतील बाबरी मशिदीचा विध्वंस, ग्रॅहम स्टेन्स नावाच्या ख्रिश्‍चन मिशनरीची हत्या आणि मालेगाव स्फोट यासह संवेदनशील ऐतिहासिक घटना आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांचे भारतविरोधी चित्रण करण्यात आले आहे.

COMMENTS