Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शुक्राचार्य मंदिराला भक्तांकडून नंदादीप भेट

कोपरगाव प्रतिनिधी - जगप्रसिद्ध असे कोपरगाव येथील परम सद्गुरु शुक्राचार्य मंदिरास सोमवार दि 12 डिसेंबर रोजी शिर्डी येथील श्री साई महिमा ग्रुप व

शुक्राचार्य मंदिर सेवकांचा कामगार दिनी सन्मान
शुक्राचार्य मंदिर सेवकांचा कामगार दिनी सन्मान
शुक्राचार्य मंदिरात शिव महापुराण व शुक्र नीती कथेचे आयोजन

कोपरगाव प्रतिनिधी – जगप्रसिद्ध असे कोपरगाव येथील परम सद्गुरु शुक्राचार्य मंदिरास सोमवार दि 12 डिसेंबर रोजी शिर्डी येथील श्री साई महिमा ग्रुप व देवकोट्टाइ येथील दानशूर भक्त गणेश वीरप्पन, उमा गणेश व गायत्री गणेश यांनी एक अतिशय आकर्षक अशी अखंड नंदादीप भेट म्हणून दिली आहे. स्टेनलेस स्टील पासून बनवलेला हा नंदादीप 5 फूट उंच व अतिशय आकर्षक असून त्यामुळे परम सद्गुरु शुक्राचार्य मंदिरात अखंडपणे नंदादीप देवत राहणार आहे यामुळे मंदिराची शोभा अजून वाढणार असून त्याबद्दल ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी दानशूर भक्त गणेश वीरप्पन, उमा गणेश,गायत्री गणेश तसेच साई महिमा ग्रुप शिर्डी यांचा सन्मान करत धन्यवाद व्यक्त केले आहे. या प्रसंगी मंदिर प्रमुख सचिन परदेशी, उपमंदिर प्रमुख प्रसाद पर्हे, संजय वडांगळे, बाळासाहेब आव्हाड यांच्यासह मंदिराचे पुजारी व भक्त उपस्थित होते.

COMMENTS