Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार काळेंनी केलेली विकासमकामे जनतेपर्यंत पोहचली पाहिजे – संदीप वर्पे

खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व्हर्च्युअल रॅली उत्साहात

कोपरगाव प्रतिनिधी :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी देशाच्या कृषिमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी आपल्या देश

डॉ.अमोल बागुल यांना नीति आयोगाचा राष्ट्रीय पुरस्कार
श्रद्धा व विकासाची सांगड घालून शिर्डीचे महत्व वृद्धिंगत करणार
चित्रकला परीक्षेत गौतम पब्लिक स्कूलचे यश

कोपरगाव प्रतिनिधी :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी देशाच्या कृषिमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी आपल्या देशाला अन्नधान्य आयात करावे लागत होते. मात्र ज्यावेळी पवार यांनी कृषिमंत्री पदाचे सूत्र हाती घेतले तेव्हापासून त्यांनी राबविलेल्या अनेक योजनांमुळे शेतकरी अर्थसंपन्न होऊन आपला देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊन अन्नधान्य निर्यात करू लागला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मजबूत करण्यासाठी पवार साहेबांनी केलेले डोंगराएवढं काम व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच नेते आणि आ.आशुतोष काळे केलेली विकासकामे जनमाणसांपर्यंत पोहचले पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी केले आहे.


देशाचे माजी कृषिमंत्री पद्मविभूषण खा. शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव येथे व्हर्च्युअल रॅली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी हजारो कोटी निधी आणून केलेली विकासकामे बिगर राजकीय नागरिकांपर्यंत पोहचविल्यास आपण प्रत्येक निवडणुकीत विरोधकांना मात देऊ.पवार साहेबांनी आ.आशुतोष काळे यांना राज्य पातळीवर काम करण्याची संधी दिली असून त्यांना कायम राज्य पातळीवर मतदार संघाचे नेतृत्व करण्यासाठी कार्यकर्त्यांनी अविरतपणे काम करावे. नेत्यांचे वाढदिवस हे प्रेरणा घेण्यासाठी असतात. वय वर्षे 82 असतांना देखील पवार साहेब सातत्याने पक्षासाठी काम करीत आहे. आपण देखील यापुढे त्यांचा आदर्श घेऊन आ.आशुतोष काळे यांनी मतदार संघात केलेली कोट्यावधी रुपयांची विकासकामे जनतेपर्यंत घेऊन जाण्याचा निर्धार करावा असे आवाहन केले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी म्हणाले की, पवार साहेबांनी त्यांच्या सामाजिक व राजकीय कारकिर्दीत महाराष्ट्र घडविला, वाढविला व देशाच्या मंत्रिमंडळात महत्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळत असतांना दिन-दलित, गरीब, शेतकरी, कष्टकरी नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्‍न, शेतकर्‍यांच्या  अडचणी, गोरगरिबांचे प्रश्‍न सोडविण्याचे काम केले. शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, सहकार, राजकीय आदी क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान असून त्यांच्या मार्गदर्शनाची देशाला व राज्याला गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, शहराध्यक्ष सुनील गंगूले, महिला शहराध्यक्ष प्रतिभा शिलेदार, युवती तालुकाध्यक्ष वैशाली साबळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम, राहुल रोहमारे, दिनार कुदळे, सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS