Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेना कुणाची होणार लवकरच फैसला निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू

...तर, ठाकरे गटाच्या अडचणी वाढणार

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः शिवसेना कुणाची, याचा फैसला लवकरच होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्ता संघर्षासंदर्भातील सुनावणी ज

शेतकर्‍यांचे अश्रू पुसण्यास सरकारला वेळ नाही : छत्रपती संभाजीराजे यांची सडकून टीका
ठाकरेंना फक्त पैशांशीच घेणे देणे
कर्नाटक सीमाप्रश्‍नी न्यायालयीन लढा – मुख्यमंत्री शिंदे

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः शिवसेना कुणाची, याचा फैसला लवकरच होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्ता संघर्षासंदर्भातील सुनावणी जानेवारी महिन्यात होणार असली तरी, शिवसेना नेमकी कुणाची यासंदर्भातील सुनावणी सोमवारपासून निवडणूक आयोगासमोर सुरु झाली आहे. ही सुनावणी केवळ पाच-सात मिनिटे पडली असली तरी, शिवसेनेचे 40 आमदार आणि 13 खासदार आपल्यासोबत असल्यामुळे आपण शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे.


विधानसभेची ताकद आणि मूळ राजकीय पक्षाची ताकद दोन्ही आपल्या पाठीशी आहे, असा युक्तीवाद शिंदे गटाकडून निवडणूक आयोगापुढे करण्यात आला. भारतीय निवडणूक आयोगाने चिन्हाच्या पैलूचा विचार करताना फक्त प्रकरणामधली तथ्यात्मक मॅट्रिक्सचा विचार केला पाहिजे. पक्षातीसल कोणत्या गटाला पक्षाचे चिन्ह द्यायचे, हा प्रश्‍न ठरवताना विशिष्ट गटाची संख्याबळ हाच एकमेव घटक ठरवला गेला पाहिजे, अन्य काही नाही, असा युक्तीवाद शिंदे गटाकडून निवडणूक आयोगापुढे करण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरे आणि शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला काही कागदपत्र देण्यात आली. या प्रकरणाची पुढची सुनावणी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. कोणत्या पक्षाने किती सदस्यांनी माहिती दिली, किती कागदपत्र सादर केली, याबद्दल पुढील सुनावणीमध्ये चर्चा होणार आहे. अशी माहिती अनिल देसाई यांनी दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने खासदार अनिल देसाई उपस्थित होते. मात्र बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या वतीने कुणीही हजर नव्हते. दोन्ही गटांकडून निवडणूक आयोगात वकिलांची फौज होती. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने जवळपास 15 लाखापेक्षा जास्त प्राथमिक सदस्यांचे पत्र आणि तीन लाखाच्या जवळपास शपथपत्र केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये आतापर्यंत सादर करण्यात आली आहेत. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या वतीने 7 लाख सदस्यांची नावे केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर दावा ठोकला. याचकाळात शिवसेनेचे 18 पैकी 13 खासदारही शिंदेंसोबत आले. शिवसेना कुणाची हा निर्णय निवडणूक आयोग घेईल, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवले. निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरेंच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तर शिंदेंच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिले. आयोगाकडून ठाकरेंना मशाल आणि शिंदेंना ढाल-तलवार हे चिन्ह देण्यात आले आहे.


आजपासून युक्तीवादाला होणार सुरुवात – शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून 15 लाखापेक्षा जास्त प्राथमिक सदस्यांचे पत्र आणि तीन लाखाच्या जवळपास शपथपत्र निवडणूक आयोगाकडे दाखल केली आहे. मात्र ठाकरे गटासोबत आमदार आणि खासदारांची संख्या नगण्य आहे. यानंतर आता आजपासून प्रत्यक्ष युक्तीवाद सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांतच शिवसेना कुणाची याचा फैसला निवडणूक आयोग देण्याची शक्यता आहे.

COMMENTS