Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निर्भया पथकातील गाडया बंडखोर आमदारांच्या ताफ्यात

विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड

मुंबई प्रतिनिधी - निर्भया फंडातून मुंबई पोलिसांनी खरेदी केलेली वाहने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाच्या आमदारांच्या संरक्षणासाठी वापरण्यात

मीच “मुख्यमंत्री” आहे हे एकनाथ शिंदेंनी सिद्ध करावे.
सीमावाद प्रश्‍न चिघळणार  !
समृद्धी महामार्ग पुण्याला जोडणार

मुंबई प्रतिनिधी – निर्भया फंडातून मुंबई पोलिसांनी खरेदी केलेली वाहने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाच्या आमदारांच्या संरक्षणासाठी वापरण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील महिलांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया फंडातून खरेदी करण्यात आलेली वाहने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थक आमदारांच्या सुरक्षितेसाठी वापरण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.


शिवसेनेतून बंड केल्यानंतर शिंदे गटाच्या सर्व आमदारांना व्ही दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. त्यासाठी महिलांच्या सुरक्षिततेसाठी तैनात करण्यात आलेली वाहने आमदारांच्या सुरक्षिततेसाठी वापरली जात असल्याचा धक्कादायक खुलासा झाल्यानंतर त्यावरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपसह शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. या घटनेचा खुलासा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुंबईत महिलांची सुरक्षा करण्यासाठी निर्भया फंडातून 30 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यातून मुंबई पोलिसांनी 220 बोलेरो, 35 एर्टीगा, 313 पल्सर आणि 200 अ‍ॅक्टीव्हा खरेदी केल्या होत्या. त्यानंतर या गाड्यांच्या तुकडीचा समावेश मुंबई पोलिसांच्या ताफ्यात करण्यात आला होता. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गटातील बंडखोर आमदारांच्या सुरक्षेसाठी महिला सुरक्षेसाठी असणार्‍या 47 बोलेरो गाड्यांचा वापर करण्यात आला. त्यातील 17 गाड्या मुंबई पोलीस दलाला परत करण्यात आल्या होत्या. परंतु अजूनही 30 गाड्या शिंदे गटातील बंडखोर आमदारांच्या सुरक्षेत तैनात असल्याची माहिती समोर आली आहे. निर्भया निधी महिलांची सुरक्षितता, महिलांवरील गुन्हे रोखण्यासाठी केंद्रातील तत्कालीन युपीए सरकारनं तयार केलेला होता. या निधीतून पोलिसांच्या कामकाजात सुलभता यावी म्हणून वाहने खरेदी केली गेली. मात्र खरेदी केलेल्या वाहनांचा उपयोग फुटीर आमदारांच्या संरक्षणासाठी केला जात असल्याचं सांगत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

COMMENTS