Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुजरातमध्ये झाले तेच मुंबईत होणार – मंत्री मंगलप्रभात लोढांचा दावा

मुंबई प्रतिनिधी - गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजने 27 वर्षांचा विक्रम मोडीत काढत सर्वाधिक जागा जिंकत विरोधकांना धोबीपछाड दिली आहे. गुजरात विधानसभा

गर्दी होण्याचा दोष अजित पवारांचा नाहीः चंद्रकांतदादा
Madha : व्यायामशाळा चोरी प्रकारणीची सोमय्यानी मागितली माहिती (Video)
कुंकूलोळ कुटुंबियांनी उभारले स्वखर्चातून बस निवारा शेड

मुंबई प्रतिनिधी – गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजने 27 वर्षांचा विक्रम मोडीत काढत सर्वाधिक जागा जिंकत विरोधकांना धोबीपछाड दिली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालांत भाजपने 182 जागांपैकी तब्बल 151 जागांवर आघाडी घेत सलग सातव्यांदा बहुमतानं सत्तास्थापनेच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे. आम आदमी पार्टी आणि काँग्रेसचा गुजरातमध्ये सुपडा साफ झाला असून आघाडी कायम राखली तर भाजपनं आतापर्यंतचा हा सर्वात मोठा विजय ठरणार आहे. परंतु आता गुजरातच्या निकालानंतर त्याचे महाराष्ट्रातही पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. भाजप नेत्यांनी गुजरातमधील विजयाआधीच जल्लोष करायला सुरुवात केली असून गुजरातप्रमाणेच मुंबई महापालिका निवडणुकीतही विजय मिळवणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळं आता भाजप आणि शिवसेनेत पुन्हा राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.


गुजरातमध्ये विजयाकडे घेऊन जाणारी मोठी आघाडी मिळाल्यानंतर राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढांनी गुजरातप्रमाणेच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही विजयाचा दावा केला आहे. माध्यमांशी बोलताना मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, गुजरातमधील आमचा हा विजय आगामी मुंबई महापालिकेतील विजयाची नांदी ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाची पावती लोकांनी भाजपला दिली आहे. त्यामुळं आता गुजरातप्रमाणेच आम्ही मुंबई महापालिकेत मोठ्या बहुमतासह सत्तेत येणार असल्याचा दावा मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केला आहे. याशिवाय भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही गुजरातमधील यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. गुजरातमध्ये भाजपनं विजयासाठी आम आदमी पक्षासोबत साटंलोटं केल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केला आहे. दिल्ली महापालिकेतील विजयाच्या बदल्यात आपने गुजरातमध्ये काँग्रेसची मते खाल्ली आहेत, त्यामुळेच भाजपच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचा म्हणत खासदार संजय राऊतांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.

COMMENTS